Join us  

'यमला पगला दिवाना फिर से'मधील 'लिटील लिटील...' गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 12:12 PM

'यमला पगला दीवाना फिर से'मध्ये धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओलसोबत सलमान खानही दिसणार आहे.

ठळक मुद्दे'यमला पगला दिवाना' सिनेमाचा तिसरा भाग भेटीलासलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतहार्डी संधूने 'लिटील लिटील...' गाण्याला दिला स्वरसाज

'यमला पगला दिवाना फिर से' हा देओल पिता पुत्रांचा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील 'लिटील लिटील...' हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 

'लिटील लिटील...' या गाण्यावर देओल पिता-पुत्र बेधुंद नाचताना दिसून येत आहेत. 'यमला पगला दिवाना' या सिनेमाचा हा तिसरा भाग असून धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतच या सिनेमात अभिनेत्री क्रिती खरबंदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील 'लिटिल लिटिल' या पार्टी गाण्याचे बोल आहेत 'मैं लीटर लीटर पी गया भई लिटिल लिटिल करके...' हे गाणे गायले आहे हार्डी संधूने. 

'यमला पगला दिवाना फिर से' मध्ये बॉबी देओल महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच या तिघांच्या गॅंगसोबतच सलमान खान पाहुणा कलाकार म्हणून एका सीनमध्ये एन्ट्री करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 'यमला पगला दिवाना फिर से' हा संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन भागांप्रमाणेच बॉबी देओल आणि सनी देओल भाऊ म्हणूनच या सिनेमातही व्यक्तिरेखा साकारतील. क्रिती खरबंदा चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर धर्मेंद्र यांची भूमिका प्रेक्षकांसाठी सरप्राईज असून या नवीन भागात ते वकिलाच्या भूमिकेत दिसतील.'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपट आधी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण, त्याच दिवशी अक्षय कुमारचा गोल्ड व जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' देखील प्रदर्शित होणार होता. बॉक्स ऑफिसवरील क्लॅशपासून बचाव करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. 'यमला पगला दिवाना फिर से' हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :धमेंद्रबॉबी देओलसनी देओल