Join us

​आमिर खानसाठी नव्हे तर या अभिनेत्यासाठी लिहिण्यात आली होती दंगलची पटकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:28 IST

आमिर खान प्रॉडक्शन्स, वॉल्ट डिस्ने पिक्चर्स आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्स यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी ...

आमिर खान प्रॉडक्शन्स, वॉल्ट डिस्ने पिक्चर्स आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्स यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. आमिर खानबरोबर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वरची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. 'दंगल' चित्रपटातील भूमिकेद्वारे झाहिरा वासिम, फातिमा सना शेख आणि अपारशक्ती खुराणा या कलाकारांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या दोन मुलींच्या अढळ निश्चयाच्या या थक्क करणाऱ्या चित्रपटाला चीन आणि हाँगकाँगसह जगभरात उदंड प्रतिसाद मिळाला. दंगल या चित्रपटातील आमिर खानच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील आमिरची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटासाठी आमिरला अनेक पुरस्कारही मिळाले. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाची कथा ही लेखकाने इरफान खानला समोर ठेवून लिहिली होती. पण त्यानंतर हा चित्रपट इरफानला ऑफर न करता आमिरला ऑफर करण्यात आला आणि आमिरने या चित्रपटात काम करण्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती देखील करण्याचे ठरवले. संसार चालविण्यासाठी कुस्ती खेळून पुरेसे पैसे मिळत नसल्याचे जाणवल्याने महावीर फोगट नाइलाजाने हरयाणातील आपल्या बळाली गावात येऊन नोकरी पत्करतो. देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे आपले स्वप्न भंगलेला महावीरलिंह फोगट हे स्वप्न आपल्या मुलांकडून पूर्ण करण्याचा निर्धार करतो. पण त्याची पत्नी दया (साक्षी तन्वर) चौथ्यांदा मुलीलाच जन्म देते आणि त्याचे हे स्वप्न पुन्हा अपूर्णच राहणार अशी चिन्हे दिसतात. पण एके दिवशी गीता (झाहिरा वासिम) आणि बबिता (सुहानी भटनागर) या त्याच्या दोन मुली एका मुलाला मारून घरी परतात, तेव्हा आपल्या मुलींमध्ये मल्लविद्येचे कौशल्य असल्याची जाणीव महावीरला होते. यानंतर या दोन मुलींना जागतिक पातळीवरील पैलवान करण्यासाठी महावीरसिंह जे अपार कष्ट घेतो आणि या मुलींकडून कठोर परिश्रम करून घेतो, त्याची फळे नंतर दिसू लागतात. या मुली जाहीर कुस्त्यांमधून त्यांच्या वयाच्या मुलांना चीतपट करतात. गीता (फातिमा सना शेख) आणि बबिताकुमारी (सान्या मल्होत्रा) या मुली तरूणपणी कुस्त्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर नाव कमावतात. तसेच कुस्तीत देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे आपल्या वडिलांचे स्वप्न देखील पूर्ण करतात. Also Read : ​‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने तयार केली खास ‘प्रमोशनल स्ट्रॅटेजी’