Join us

Women’s Day special : ‘या’ आहेत first ladies of indian cinema

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 10:41 IST

आज (८ मार्च) जागतिक महिला दिन. भारतीय चित्रपटसृष्टीत महिलांचे मोठे योगदान आहे. चूल आणि मूल हेच केवळ स्त्रियांचे काम,अशा काळात पुरुषांना स्त्री पात्र रंगवण्यावाचून पर्याय नव्हता. पण काळासोबत अनेक बंधने झुगारून स्त्रिया समोर आल्या आणि प्रसंगी समाजाचा विरोध पत्करून चित्रपटसृष्टीत दाखल झाल्या. त्यांच्यावर एक नजर...

आज (८ मार्च) जागतिक महिला दिन. भारतीय चित्रपटसृष्टीत महिलांचे मोठे योगदान आहे.  चूल आणि मूल हेच केवळ स्त्रियांचे काम,अशा काळात पुरुषांना स्त्री पात्र रंगवण्यावाचून पर्याय नव्हता. पण काळासोबत अनेक बंधने झुगारून स्त्रिया समोर आल्या आणि प्रसंगी समाजाचा विरोध पत्करून चित्रपटसृष्टीत दाखल झाल्या. आज भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री अभिनेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पण त्या काळात, अनेकींनी अनंत अडचणींना सामोरं जात, चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले. त्यांच्यावर एक नजर... देविका राणी देविका राणी म्हणजे पहिली अभिनेत्री शिवाय पहिला किसिंग सीन देणारी नटी. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला कलाकार असलेल्या देविका राणी यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या त्या पहिल्या कलाकार. लंडनच्या रॉयल अकॅडमी आॅफ ड्रामा अ‍ॅन्ड म्युझिकमध्ये त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. १९३३ मध्ये ‘कर्म’ या चित्रपटात  देविका राणी यांनी पहिला लिपलॉक किसिंग सीन दिला आणि सगळीकडे खळबळ उडाली.  हा सीन तब्बल ४ मिनिटांचा होता. दिलीप कुमार ही देविका राणी यांनी बॉलिवूडला दिलेली देणगी असल्याचंही म्हटलं जातं. दिलीप कुमार यांना बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय देविका राणी यांना जात. सन १९९४ मध्ये मोठ्या  पडद्यावरची पहिली नायिका काळाच्या पडद्याआड गेली. फातमा बेगम फातमा बेगम म्हणजे पहिली लेडी कॅप्टन आॅफ शिप.  मोठ्या पडद्यावर दिसण्यापूर्वी पडद्यामागे असलेली भूमिका स्वीकारणं फातमा बेगम यांनी पसंत केलं. बॉलिवूडची पहिली महिला दिग्दर्शक होण्याचा मान फातमा यांनी पटकावला आहे. १९२२ मध्ये आलेल्या ‘वीर अभिमन्यू’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. ४ वर्षांत त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या सर्वच क्षेत्रात पाऊल ठेवलं. केवळ एवढेच नाही तर सन १९२६ मध्ये स्वत:ची निर्मिती संस्था फातमा फिल्म्स थाटून त्यांनी ‘बुलबुल-ए-पाकिस्तान’चं दिग्दर्शनही केलं.झुबेदाझुबेदा यांना बोलपटांची राणी म्हटले जाते. झुबेदा म्हणजे, फातमा बेगम यांच्या कन्या.  . भारताचा पहिला बोलपट ‘आलम आरा’मध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. त्यामुळे बोलपटांची पहिली अभिनेत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. ‘आलम आरा’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बक्कळ गल्ला जमवला आणि झुबेदा यशोशिखरावर पोहोचल्या.  १९३० च्या काळात त्या सर्वाधिक मानधन घेणाºया अभिनेत्री ठरल्या. नादिरा नादिरा म्हणजे पहिली स्टंटवूमन. अलीकडे कंगना राणौतचा ‘रंगून’ सिनेमा येऊन गेला. यातील कंगनाची व्यक्तिरेखा याच नादिराच्या आयुष्याशी मिळतीजुळती होती.  आॅस्ट्रेलियामध्ये जन्मलेली मेरी इवन्स हीच पुढे नादिरा म्हणून ओळखली जाऊ लागली.   घट्ट कपडे, गुडघ्यापर्यंत येणारे शूज हा पेहराव तिची खासियत. आजही अनेक अभिनेत्री, किंबहुना अभिनेतेही स्टंटबाजीसाठी डमी वापरत असताना त्या काळात अनेक स्टंट तिने स्वत: केले. त्यात ट्रेनच्या टपावर होणारा पाठलाग, खलनायकांशी दोन हात करण्यापासून घोडेस्वारीपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. इतरांना धडा शिकवणारी नादिरा ही खºया अर्थाने बॉलिवूडची स्टंटक्वीन आहे. उषा खन्ना बॉलीवूडमधील एकमेव प्रथितयश महिला संगीतकार म्हणून उषा खन्ना यांचं नाव आदराने घेतलं जातं. उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेली गाणी तुफान गाजली. सशधर मुखर्जी यांनी रोज दोन गाण्यांना संगीत देण्याच्या बोलीवर त्यांना वर्षभर काम करण्यास सांगितलं आणि १९५९ मध्ये ‘दिल देके देखो’ मधून उषा खन्ना यांना ब्रेक दिला. त्यानंतर खन्ना यांना मागे वळून पहावं लागलंच नाही. आशा भोसले आणि रफी यांच्यासोबत त्यांनी एक काळ गाजवला. १९९० पर्यंत त्या कार्यरत होत्या. २००३ मध्ये ‘दिल परदेसी हो गया’ हा त्यांचं संगीत लाभलेला शेवटचा सिनेमा.   मीनाक्षी शिरोडकर मीनाक्षी शिरोडकर म्हणजे  मराठमोळी स्वीमसुटगर्ल. होय, यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या का.. लाजता? असं म्हणत जलक्रीडा करणारी अभिनेत्री म्हणजे तीच ती मिनाक्षी शिरोडकर. मीनाक्षी शिरोडकर यांनी 1938 मध्ये ‘ब्रम्हचारी’ चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची  त्याकाळी प्रचंड चर्चा झाली. चित्रपटात स्वीमसूट घातल्यामुळे त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. पण मिनाक्षी या सर्व टीकेला संयमाने तोंड दिले.   रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या. त्यांचे खरे नाव रतन. पण आचार्य अत्रेंनी त्यांचे  रतन हे नाव बदलून  मीनाक्षी हे नव नाव त्यांना दिले.  अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर या त्यांच्या नाती. झीनत अमानपहिली सेक्स सिम्बॉल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. माजी मिस एशिया पॅसिफिक असलेल्या मॉडेलने सिनेमांत एंट्री करून स्वत:ला बोल्ड रुपात सादर केले. तिच्या ड्रेसपासून सर्वकाही बोल्ड असे. झीनमने 70चा काळ अगदी बोल्ड करू टाकला होता. तिचा 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमातील हॉट सीन्स आजदेखील चर्चेत असतात. हिंदी सिनेसृष्टीची पहिली बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनतचे नाव पुढे येते. टुण टुण टुण टुण या अभिनेत्रीची कॉमेडी कुणाला आठवत नसेल. टुण टुण या बॉलिवूडच्या पहिल्या कॉमेडीक्वीन. बॉलिवूडमध्ये टिकायसाठी कमनीय बांधा हवा, हे समीकरण त्यांनी जणू मोडीत काढले.  गायिका आणि अभिनेत्री अशा दोन्ही क्षेत्रात वावरणाºया  टुण टुण यांचे खरे नाव उमा देवी खत्री. टुण टुण हे त्यांचे आॅन स्क्रीन नाव. वयाच्या 13 व्या वर्षी घरातून पळून आलेल्या उमादेवीने आधी पार्श्वगायनात नंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘अफसाना लिख रही हंू’ हे उमा देवींनी गायलेल गाण. नौशाद यांच्यासाठी गायची संधी मिळाली आणि उमादेवींचं लहानपणीचं स्वप्न  साकार झालं. नादिराफरहात एझेकल नादिरा उर्फ नादिरा ही बगदादी ज्युईश अभिनेत्री शिवाय पहिली खलनायिका. बोल्ड भूमिकांसाठी गाजलेली नादिरा बॉलिवूडची खºया अथार्ने पहिली खलनायिका.  खलनायिकेचा विभाग फिल्मफेअरच्या यादीत समाविष्ट करण्यापूर्वी नादिराला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे काजोल ही व्हिलनचा पुरस्कार पटकवणारी पहिली अभिनेत्री ठरली तरी बॉलिवूडची पहिली खलनायिका ही नादिराच. ‘श्री 420’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘पाकिझा’  यासारख्या सिनेमातील नादिराच्या व्यक्तिरेखा प्रचंड गाजल्या  रोल्स रॉईस कार घेणारी नादिरा ही पहिली भारतीय कलाकार आहे. शर्मिला टागोर शर्मिला टागोर यांना हिंदी सिनेसृष्टीत पहिली बिकिनी गर्ल म्हणून ओळखले जाते. 'इव्हिनिंग इन पॅरिस' या सिनेमात त्यांनी बिकिनी परिधान करून खळबळ उडवली होती. त्यापूर्वी कोणत्याच अभिनेत्रीने सिनेमात बिकिनी परिधान केली नव्हती.