Join us  

Womens Day : क्रिती सॅननने दिला ‘हा’ पावरफुल मॅसेज्, पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2017 2:00 PM

अभिनेत्री क्रिती सॅनन हिने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पावरफुल मॅसेज शेअर केला आहे.

अभिनेत्री क्रिती सॅनन हिने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पावरफुल मॅसेज शेअर केला आहे. खरं तर सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा संदेशांचा पाऊस पडत असल्याने क्रिती या दिवसानिमित्त वेगळ्याच स्टॅण्ड घेताना बघावयास मिळाली. क्रितीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘पुन्हा एकदा... हॅप्पी व्हॉटएव्हर!’ या संदेशातून क्रितीचे म्हणणे आहे की, एकेकीकडे महिला शक्ती आणि जेंडर इक्वॅलिटीची चर्चा केली जाते अन् दुसरीकडे वास्तव काही वेगळेच आहे. कारण आजही महिलांना कशा प्रकारचे कपडे परिधान करायला हवेत, याविषयीचे सल्ले दिले जातात. त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा आजही कायम आहे. क्रितीच्या हा व्हिडीओ युजर्सकडून मोठ्या प्रमाणात बघितला जात असून, तिने दिलेला संदेश खरोखरच विचार करण्यास भाग पाडणारा आहे. क्रितीप्रमाणेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानेदेखील ट्विट करून आई तसेच गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले की, माझ्या आयुष्यातील या दोघी सर्वाधिक स्ट्रॉँग लेडी आहेत. यावेळी त्याने दोघींचेही कौतुक केले आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत हिरोपंती या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया क्रितीने अखेरचा सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या ‘दिलवाले’मध्ये काम केले होते. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता शाहरूख खान, काजोल आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. क्रिती दिनेश विजान यांच्या ‘राब्ता’ या सिनेमात काम करीत असून, तिच्यासोबत सुशांतसिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर आयुष्यमान खुराणा याच्यासोबत ‘बरेली की बर्फी’ यामध्येदेखील बघावयास मिळणार आहे.