Join us

​छोट्या पडद्यावर पुन्हा काम करायची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 14:49 IST

अभिनेता शाहरुख खानने आपल्या कारकिदीर्ची सुुरुवात ‘फौजी’ या मालिकेद्वारे केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा किंग झाल्यानंतर शाहरुखने छोट्या पडद्यावर सूत्रसंचालन ...

अभिनेता शाहरुख खानने आपल्या कारकिदीर्ची सुुरुवात ‘फौजी’ या मालिकेद्वारे केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा किंग झाल्यानंतर शाहरुखने छोट्या पडद्यावर सूत्रसंचालन केलेले आहे.शाहरुख छोट्या पडद्यावर रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकला असला तरी तो इतकी वर्षं मालिकांपासून दूरच राहिला आहे. सध्या अनेक सुपरस्टार मालिकेत काम करत आहेत. त्यामुळे शाहरुखलाही मालिकेत काम करायला आवडेल असे त्याचे म्हणणे आहे.अमेरिकेत ज्याप्रकारे ठराविक भागांच्या मालिका बनवल्या जातात, तशा प्रकारची ठराविक भागांची मालिका असेल तर मी छोट्या पडद्यावर नक्कीच काम करेन असे तो सांगतो.