Join us  

लोकसभेची निवडणूक लढवणार का? विचारताच रणदीप हूडाने स्पष्टच दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:55 AM

रणदीप हूडाने लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर मौन सोडलंय. काय म्हणाला रणदीप बघा...

सध्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची खुप चर्चा आहे. या सिनेमात रणदीप हूडा वीर सावरकरांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा पुढील शुक्रवारी भेटीला येणार आहे. रणदीप हूडा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण म्हणजे रणदीप २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची दाट शक्यता होती. पण आता खुद्द रणदीपने या चर्चांवर मौन सोडलंय. 

पीटीआयशी बोलताना रणदीपने याविषयी स्पष्ट मत सांगितलंय. तो म्हणाला, "राजकारण हे चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांप्रमाणेच एक गंभीर करिअर आहे. सध्या मी माझ्या चित्रपटांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. मी एका वेळी एकच गोष्ट करू शकतो. सध्या मला अभिनेता आणि नंतर दिग्दर्शक म्हणून चित्रपटांसाठी काम करायचे आहे. सध्या चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात जाणे योग्य नाही."

त्यामुळे इतक्यात तरी रणदीपचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही हे उघड झालंय. दरम्यान रणदीपची प्रमुख भूमिका असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमात रणदीपसोबतच अंकिता लोखंडे, अमित सियाल या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :रणदीप हुडाविनायक दामोदर सावरकरलोकसभा