Join us

मतदानाचा दिवस ‘ड्राय डे’ का असतो; पूजा बेदीला पडलाय प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 18:25 IST

महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी मतदानाचा हक्क बजावला, मात्र अशातच अभिनेत्री व मॉडेल पूजा बेदीला ...

महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी मतदानाचा हक्क बजावला, मात्र अशातच अभिनेत्री व मॉडेल पूजा बेदीला एक मोठा प्रश्न पडला आहे. मतदानाचा दिवस ‘ड्राय डे’ का असतो असा प्रश्न तिने सोशल मीडियाहून विचारला आहे. याबद्दलची आपली भूमिका तिने सविस्तर मांडली आहे.  आमिर खान याच्या ‘जो जिता वही सिंकदर’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रींची भूमिका करणारी पूजा बेदी हिने अनेक जाहिरातीमधून आपली ओळख निर्माण केली आहे. मॉडर्न लाईफस्टाईलसाठी ओळखल्या जाणाºया पूजाला,  मतदानाचा दिवस ‘ड्राय डे’ असतो ही गोष्ट अद्भूत वाटते. भारतात असलेला हा प्रकार हास्यास्पद असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. यासोबतच तिने महत्वाचे व उत्सवाचे दिवस ड्राय डे असतात याचेही आश्चर्य व्यक्त केले आहे. पूजा बेदी हिने ट्विट करून आपले मत मांडले आहे. पूजा म्हणाली, ‘‘त्यांनी दारू पिण्यासाठी वयाची अट वाढवून २५ केली आहे. त्यानंतर त्यांनी मतदानाचा दिवस ड्राय डे ठरवला आहे. भारतीय नागरिक गुंड आणि बेजबाबदार आहेत असे सरकारला वाटते का ? ड्राय डे हास्यास्पद प्रकार आहे कारण याचा आर्थिक फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसतो. ज्या लोकांना दारू प्यायची आहे ते घरी बसून पिऊ शकतात,’’ आपल्या मताला दुजोरा देत पूजा म्हणते, ‘‘गंमत म्हणजे मतमोजणी आणि निकालाचा दिवसही ड्राय डे असतो. मतमोजणी सुरळीत पार पडावी म्हणून हे केल्याचे सांगितले जाते. पण आता सर्व इलेक्ट्रॉनिक आहे आणि व्होटिंंग मशीन्स दारू घेत नाहीत.’’यासाठी तिने जगातील अनेक उत्सवाच्या दिवसांचा दाखला दिला आहे. तिच्या मते जगभरात अनेक उत्सव दारू पित साजरे केले जातात. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात दारू पिणारे लोक आहेत.