Join us

तु इतका हॉट कसा? फॅनच्या प्रश्नावर शाहरुखचे भन्नाट उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 18:17 IST

वेळात वेळ काढून शाहरुखही चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. ask srk असे म्हणत त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

बॉलिवूडचा बादशाह सध्या चर्चेत आहे ते त्याचा आगामी सिनेमा पठाणमुळे. अनेक दिवसानंतर शाहरुख खान अॅक्टीव्ह झाल्याने त्याचे चाहते प्रचंड खुश आहेत. वेळात वेळ काढून शाहरुखही चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. ask srk असे म्हणत त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शाहरुख आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर तर सगळ्यांना माहितच आहे. त्यामुळे अगदी भन्नाट तेवढीच मजेशीर उत्तरे त्याने चाहत्यांना दिली. 

शाहरुखची फिमेल फॅन फॉलोइंग तर जबरदस्त आहे. एका चाहतीने शाहरुखला विचारले, 'तु इतका हॉट कसा दिसतोस ?' त्यावर शाहरुखनेही भन्नाट उत्तर दिले आहे. शाहरुख म्हणतो 'बहुदा पेरीपेरी सॉस आणि चिकन चा हा कमाल आहे.'

यासोबतच शाहरुखने पुन्हा सलमान खान आणि त्याच्यात असलेली बॉंडिंग दाखवली आहे. खूप प्रेमळ आणि खूप चांगला भाई असा उल्लेख केला आहे. तर अक्षय कुमार जुना मित्र असून खूपच मेहनती असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. 

तर एका फॅन ने शाहरुखला विचारले, 'माझ्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्यासोबत लग्न झाले. मला तिच्यासोबत पठाण पाहायचा होता.'  यावर शाहरुख म्हणतो, 'ऐकून वाईट वाटलं, पण हरकत नाही एकटाच बघ, सिनेमा नक्की आवडेल.'

वाईट काळातून बाहेर पडून बादशाहसारखे आयुष्य तु कसे जगतो ? चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'वाईटावर चांगल्या गोष्टी नेहमीच मात करतात.'

 

टॅग्स :शाहरुख खान