Join us

विवाहित जोडप्यांचे पुरागमन सुखद का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:02 IST

या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ऐश्‍वर्या रायच्या जज्बा चित्रपटाबाबत एक बातमी आली होती की, अभिषेक बच्चनने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची ...

या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ऐश्‍वर्या रायच्या जज्बा चित्रपटाबाबत एक बातमी आली होती की, अभिषेक बच्चनने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करण्यास नकार दिला होता. ज्युनियर बच्चन यांनी नकार दिला नसता तर लग्नानंतर प्रथमच तो आपल्या पत्नीसोबत पडद्यावर दिसला असता. एक आणखी दुसरे वृत्त ऋषी कपूरबाबत आहे. ऋषी कपूरने नुकतेच मान्य की ते आपली पत्नी नीतू सिंगसोबत यापुढेही काम करण्यास तयार आहेत. मात्र त्यांच्याकडे सध्या तसा काही प्रस्ताव नाही आणि ते अशा प्रस्तावाची प्रतीक्षा करीत आहेत. बेशर्म चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याने रणबीर कपूरव्यतिरिक्त ऋषी-नीतूच्या जोडीच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. बेशर्म पूर्वी नीतूसोबत ऋषी कपूरची जोडी यशस्वी राहिली होती.हे दोन्ही वृत्त विवाहित जोडप्यांच्या पडद्यावरील पुनरागमन सुखद नाही राहत, हेच सिद्ध करतात. ज्यांना विवाहापूर्वी यशस्वी जोडी मानले गेले ते सैफ अली खान आणि करिना कपूरचेही असेच आहे. त्यांनी कुर्बानमध्ये काम केले होते, मात्र चित्रपट चालला नाही. त्यानंतर दोघेही आतापर्यंत सोबत दिसले नाहीत. अजय देवगनने स्वत: दिग्दर्शित केलेला चित्रपट यू मी एंड हममध्ये काजोलला संधी दिली होती. लग्नानंतर दोन्ही प्रथमच सोबत आले होते, मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी राहिला आणि ते नंतर सोबत दिसले नाहीत.विवाहित जोडप्यांचा पडद्यावरील पुनरागमनाचा इतिहास गमतीशीर राहिला आहे. दिलीप कुमार यांनी सायरा बानोसोबत लग्नानंतर गोपी, सगीना आणि बैराग चित्रपटात काम केले होते. गोपी बॉक्स ऑफिसवर यशस्वी राहिला, मात्र सगीना आणि बैराग अयशस्वी ठरले. महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी शोलेच्या दरम्यान लग्न केले.शोले सारख्या मोठय़ा यशस्वी चित्रपटानंतर जया बच्चन यांनी घरगुती जीवनाला पसंती दिली.अनेक वर्षानंतर जेव्हा सिलसिलापासून जयाचे पुनरागमन झाले तर, त्यांच्या पुनरागमानाचे कारण समजण्यास कोणाला वेळ लागला नाही आणि हे पुनरागमन यशस्वी ठरले नाही. जेव्हा बच्चन मुख्य भूमिका करु लागले, तर करण जाैहर यांनी कभी खुशी कभी गममध्ये पती-पत्नीला पडद्यावर सोबत आणले, मात्र शोलेपूर्वी या जोडीच्या यशाची तुलना लग्नानंतरच्या कोणत्याही चित्रपटासोबत होऊ शकत नाही. फू'६ी''>ंल्ल४्न.ं'ंल्ल'ं१''ें३.ूे/फू'६ी''> फू'६ी''>ऋीं३४१ी/फू'६ी''>