Join us  

मुंबईत पोहोचल्यावर कंगना राणौतला का नाही केलं क्वारंटाईन, BMCअधिकाऱ्याने सांगितले महत्त्वाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 5:08 PM

कंगना राणौत 9 सप्टेंबर हिमालच प्रदेशहुन मुंबईत आली आहे

कंगना राणौत 9 सप्टेंबर हिमालच प्रदेशहुन मुंबईत आली आहे. कंगना मुंबईत येण्या आधीच मुंबई महानगर पालिकेनं तिचं कार्यालय तोडलं होते. एमसीने कंगनाच्या ऑफिसमधील बांधकाम अनधिकृत आहे असे सांगत तोडफोड केली. असे ही बोलले जात होते की, कंगना मुंबई आल्यावर तिला क्वारंटाइन करण्यात येईल, पण असे काही झाले नाही. बीएमसीच्या अधिकाऱ्याने यामागील कारण सांगितले आहे.  

म्हणून कंगना झाली नाही क्वारंटाइन

मुंबईत विमानात आलेल्या प्रवाशांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन होण्याचा नियम आहे. मात्र कंगनाला यातून सूट देण्यात आली.नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार बीएमसीच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कंगना इथं एका आठवड्यापेक्षा कमी दिवस राहणार आहे. याकारणामुळे तिला शॉर्ट-टर्म व्हिजीटरच्या कॅटेगरीनुसार सूट देण्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कंगना 14 सप्टेंबरला परत जाणार आहे.   

 

सुनावणी पुढे ढकललीआज अभिनेत्री कंगना कार्यालयावर पालिकेने केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने २२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी ही याचिका दाखल केली आहे.कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयालर पालिकेनं काल सकाळी कारवाई सुरू केली. अवैध बांधकाम प्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिशीला २४ तास उलटून गेल्यानं पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते.

कार्यालयानंतर कंगनाच्या फ्लॅटवर बीएमसीची नजर मुंबई महापालिकेने दिवाणी न्यायालयाकडे कंगना रणौतचे खारमधील घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. पालिकेचे म्हणणे आहे की कंगनाच्या फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले आहे. मुंबईतील खार रोड पश्चिम भागात 16 व्या रोडवर डिब्रीझ अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर कंगनाचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये एफएसआयचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये कंगनाला एमआरटीपी नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेच्या एमआरटीपी नोटीस विरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी कोर्टाने कंगनाची बाजू ऐकून घेत पुढील कारवाईस स्टे दिला होता, तर पालिकेला यावर सविस्तर बाजू मांडण्यास सांगितले होते.

कंगनाचा शिवसेनेवर पुन्हा निशाणा ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.

कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; संजय राऊत म्हणतात...

 

टॅग्स :कंगना राणौतशिवसेना