Join us

चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास संजय दत्तने दिला होता नकार?, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 12:57 IST

Sanjay Dutt refuse to work with Amitabh Bachchan : संजय दत्तने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला बॉलिवूडचे सगळेच कलाकार उत्सुक असतात.  पण बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्याने अमिताभ बच्चन  यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. एक काळ असा आला की संजय दत्तने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. 1992 मध्ये ‘खुदा गवाह’ सिनेमात संजय दत्तला बिंग बींसोबत सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि बिग बी पाहुण्या कलाकाराच्या  भूमिकेत दिसणार असल्याने संजू बाबाने हा सिनेमा नाकारला.

मीडिया रिपोर्टनुसार संजय दत्तला या सिनेमासाठी आधी अप्रोच करण्यात आला होता. संजय दत्तला या सिनेमात जास्तवेळ स्क्रिन टाईमिंग मिळणार नाही हे कारण सांगत नकार दिला होता.  'खुदा गवाह' सिनेमाचे दिग्दर्शक मुकुल एस आनंद यांनी संजय दत्तला हा चित्रपट साइन करण्यासाठी विनंती केली होती, पण असं काही घडलं नाही. २००२ मध्ये रिलीज झालेल्या 'कांटे' सिनेमासाठी संजय दत्तला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी अप्रोच करण्यात आला होता. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर संजय दत्त ‘केजीएफ 2’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :संजय दत्तअमिताभ बच्चन