Join us
Daily Top 2Weekly Top 5

8 जूनला सुशांतला एकटं का सोडून गेली होती रिया चक्रवर्ती? अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितले यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 18:16 IST

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन खुलासे होताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नवीन खुलासे होताना दिसत आहेत. सुशांत आणि रिया बराच काळ एकत्र होते. सुशांतच्या आत्महत्ये आधी म्हणजेच सहा दिवसांपूर्वी म्हणजे 8 जून रोजी रिया तिच्या घरी परतली होती. असे सांगितले जाते की त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर सुशांतने रियाला तिच्या घरी जाण्यासाठी सांगितले. आता यावर रिया चक्रवर्तीचे वडील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की अखेर रियाने का सुशांतचे घर सोडले होते.

एका मुलाखतीत रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, 8 जूनला रियाला सुशांतला एकटे सोडून जायचे नव्हते पण सुशांतने तिला निघून जायला सांगितले. सुशांतने त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी कित्येक वेळा फोन केला होता.रियाच्या वकीलानुसार, सुशांतच्या फोननंतर काही दिवसांनंतर त्याच्या घरातल्यांनी उत्तर दिले आणि त्यानंतर त्याची बहिण मीतू त्याच्यासोबत राहण्यासाठी आली. या दरम्यान रियाची मानसिक अवस्था ठीक नव्हती. ती एंजाइटी व पॅनिक अटॅक येत होते. सुशांतच्या वर्तणूकीतील अचानक बदल त्याच्या समस्या आणखीन वाढवत होता.

रियाच्या वकिलांनी सांगितले की, सुशांत त्याच्या कुटुंबाला फोन करत होते. त्यांना मुंबईपासून बाहेर जाण्याच्या निर्णयाबद्दल सांगत होता आणि त्याला भेटण्यासाठी विनंती करत होता. सुशांतने कित्येक दिवस फोन केल्यानंतर आणि रडल्यानंतर त्याची बहिण मीतू 8 जूनला त्याच्यासोबत राहण्यासाठी तयार झाली. त्यानंतर सुशांतने रियाला तिच्या आई वडिलांसोबत राहण्यासाठी सांगितले.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपास करण्याची मागणी करणारी मोहिम सोशल मीडियावर राबवली जात आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने याबद्दल फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. या प्रकरणी बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर सहकार्य न केल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणाची चौकशी कोण करणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती