अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी (Rhea Chakraborty) २०२० हे वर्ष खूप कठीण होते. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर ड्रग्ज प्रकरणात तिला तुरुंगात जावे लागले होते. ५ वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा तुरुंगातील दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत आणि जामीन मिळाल्यावर तिने 'नागीण डान्स' का केला, याचे कारणही सांगितले आहे.
रिया चक्रवर्तीला सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात सुमारे २८ दिवस तुरुंगात राहावे लागले होते. तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी तो काळ खूप कठीण होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने त्या दिवसांची आठवण सांगितली. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सांगितले की, तुरुंगात असताना तिला तिच्या सहकारी कैद्यांनी खूप आधार दिला.
नागीण डान्स करण्यामागचं सांगितलं कारणती म्हणाली, "त्या महिलांनी मला त्यांच्यासाठी डान्स करायला सांगितला. जामीन मिळाल्याच्या दिवशी मी नागीण डान्स केला. मला वाटले, माझी त्यांच्याशी पुन्हा कधी भेट होईल हे माहीत नाही आणि जर मी त्यांना आनंदाचा एक क्षण देऊ शकत असेल तर का नाही?' तुरुंगांमध्ये बहुतेक महिला निर्दोष असतात आणि त्यांना कोणतीही आशा नसते."
ड्रग्ज प्रकरणाचा कुटुंबावर झाला परिणामरियाने सांगितले की, सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाचा डाग अजूनही तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सोबत आहे. ती म्हणाली, "लोक म्हणाले की, 'तो तुझ्यामुळे गेला नाही'. मला नेहमीच माहीत होते की मी काहीही चुकीचे केले नाही, परंतु जेव्हा मला क्लीन चिट मिळाली, तेव्हाही मला आनंद झाला नाही. मला फक्त माझ्या आई-वडिलांसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी आनंद झाला. परंतु, आम्ही पूर्वीसारखे आनंदी कुटुंब राहिलो नाही, ते सर्व परत येऊ शकत नाही. त्या क्षणाने आमच्या सर्वांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे."