Join us  

आमिर खानने का साईन केला ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 10:50 AM

होय, आमिर चित्रपट निवडण्याच्या बाबतीत किती चौकस आहे, हे आपण जाणतोच. अशात आमिरने ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ का निवडला? याचा खुलासा अलीकडे झाला.

आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ येत्या ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणारा हा चित्रपट अनेकार्थाने खास आहे. या चित्रपटात पहिल्यांदा अमिताभ बच्चन व आमिर खान ही जोडी एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची कथा वेगळी आहे. आमिर प्रथमचं पडद्यावर ठगाची भूमिका साकारणार आहे. एकंदर काय तर आमिरच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याच चित्रपटाबद्दल एक इंटरेस्टिंग खुलासा झाला आहे. होय, आमिर चित्रपट निवडण्याच्या बाबतीत किती चौकस आहे, हे आपण जाणतोच. अशात आमिरने ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ का निवडला? याचा खुलासा अलीकडे झाला. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये खुद्द आमिरने याबाबत खुलासा केला. ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ हा एकमेव असा चित्रपट आहे, जो मी केवळ भूमिकेसाठी निवडला. यातली माझी भूमिका मला प्रचंड आवडली. अतिशय दृष्ट,कुठलीही विवेकबुद्धी नसलेली व्यक्ति जिला आपल्या आजुबाजुलाही पाहायचे नसते, असे पात्र मी यात रंगवले आहे. ही व्यक्तिरेखा तुम्हाला पडद्यावर पाहायला आवडू शकते, पण कुणीही या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडणार नाही. कारण तुम्ही या व्यक्तिरेखेवर विश्वास ठेवू शकणार नाही, असे आमिरने सांगितले.‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ची रिलीज डेट जशी जशी जवळ येतेय, तितका मी नर्व्हस होतोय, असेही आमिर म्हणाला. मी या चित्रपटाबद्दल नर्व्हस आहे. त्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे हा चित्रपट जरा वेगळा आहे. लोकांना माझे चित्रपट आवडतात, कारण त्यात कॉन्सेप्ट आणि मॅसेज असतो. पण ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ हटके आहे. लोकांना हाही चित्रपट आवडेल, अशी अपेक्षा करतो, असे तो म्हणाला. 

टॅग्स :आमिर खान