Join us  

‘८३’मध्ये कोण साकारणार सुनील गावस्कर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 3:49 PM

होय, सुनील गावस्कर यांच्या पडद्यावरील व्यक्तिरेखेसाठी मेकर्स सध्या चेहरा शोधत आहेत. पण अद्याप मेकर्सला हा चेहरा सापडलेला नाही.

रणवीर सिंग सध्या ‘गली बॉय’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘गली बॉय’ रिलीज झाला रे झाला की,  रणवीर  ‘८३’ या चित्रपटात बिझी होणार आहे. २५ जून १९८३ या दिवशी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात नोंदवल्या गेलेल्या याच विजयगाथेवर   आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर साहिल खट्टर  माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार  आहे. पण एका कास्टिंगवर मात्र मेकर्सचे घोडे अडलेय.

होय, एका माजी क्रिकेटपटूचा ‘मॅच’ शोधता शोधता मेकर्सच्या नाकीनऊ आले आहे. आता हा माजी क्रिकेटपटू कोण तर सलामीचा फलंदाज सुनील गावस्कर. होय, सुनील गावस्कर यांच्या पडद्यावरील व्यक्तिरेखेसाठी मेकर्स सध्या चेहरा शोधत आहेत. पण अद्याप मेकर्सला हा चेहरा सापडलेला नाही. त्यामुळे हा शोध कुठपर्यंत चालतो आणि कुणापर्यंत येऊन थांबतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. पुढील वर्षी १० एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अनेक रिअल लोकेशनवर चित्रपटाचे शूट होणार असून हिंदी, तामिळ व तेलगू अशा तीन भाषेत तो साकारला जाणार आहे.

  

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमाकपिल देवसुनील गावसकर