Join us  

कोण आहे रिया चक्रवर्ती, सुशांतच्या निधनानंतर होतेय तिची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:10 AM

लॉकडाऊनमध्ये सुशांतसह गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती राहत होती.

सुशांत सिंहने त्याच्या कामातून स्वतःला सिद्ध केले होते. त्यामुळे सुशांतने  रसिकांमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्याच्या अशा एक्झिटने सा-यांनाच प्रचंड धक्का बसला आहे. सुशांत एक प्रतिभावान कलाकार होता. काही निकटवर्तीयांचे म्हणण्यानुसार  सुशांतचे एका अभिनेत्रीसोबत  अफेअर सुरू होते. त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जाते. अंकिता लोखंडेनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती रिया चक्रवर्तीबाबत.

मध्यंतरी  सोशल मीडियावर त्याचे रिया चक्रवर्तीसह व्हायरल होणारे फोटोच याची अप्रत्यक्ष कबुली देत होते. प्रत्येक फोटोवर नजर टाकली असता सुशांत सिंह रिया चक्रवर्तीसह मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळायचे. फोटोंमध्ये या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे समजतंय. त्यामुळे सुशांत आणि रिया यांच्या प्रेमाचे नाते फुलत असल्याच्या जोरदार चर्चा रंगायच्या. लॉकडाऊनमध्ये सुशांतसहगर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती राहत होती. तसेच सुशांतला रियासोबत लग्नही करायचे होते. सुशांत लग्नासाठी एका पायावर तयार असला तरी रिया मात्र या लग्नासाठी तयार नव्हती. लग्नाच्या चर्चांवर सुशांतने याला अफवा असल्याचे सांगितले होते.

रिया चक्रवर्तीने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'दोबारा', 'हाफ गर्लफ्रेन्ड', 'बँक चोर' अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आहे.‘मेरे डॅड की मारूती’मधून ती प्रकाशझोतात आली होती. तसेच तिच्याबाबत नेहमी क्युट अभिनेत्री असे बोलले जायचे अशीच इमेज इंडस्ट्रीत बनू नये म्हणून तिने बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती