Join us  

राजच्या आयुष्यात कशी झाली शिल्पा शेट्टीची एन्ट्री? जाणून घ्या, कोण आहे राज कुंद्रा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:39 AM

Raj Kundra Arrested : पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात सोमवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra ) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली.

ठळक मुद्देशिल्पासोबत अफेअर सुरू झाले तेव्हा राज कुंदा आधीच विवाहित होता. 2003 साली त्याने कविता नावाच्या मुलीशी लग्न केले होते.

पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात सोमवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra ) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. पोलिसांच्या या कारवाईनंतर राज कुंद्रा कोण? शिल्पा त्याच्या आयुष्यात कशी आली? असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर आज आम्ही याचबद्दल सांगणार आहोत.  (Raj Kundra Arrested)

 कोण आहे राज कुंद्रा? राज कुंद्रा हा मोठा बिझनेसमॅन आहे, हे तुम्ही जाणताच. 9 सप्टेंबर 1975 रोजी लंडनमध्ये त्याचा जन्म झाला. राजचे वडील कधीकाळी लंडनमध्ये बस कंडक्टर होते. यानंतर त्यांनी आपला बिझनेस सुरू केला आणि आई एक शॉप आर्टिस्ट म्हणून काम करू लागली. तेव्हा राज कुंद्राचे कुटुंब फार श्रीमंत नव्हते. पण आज राज मोठा बिझनेसमॅन म्हणून ओळखला जातो.

 पहिली पत्नीशिल्पासोबत अफेअर सुरू झाले तेव्हा राज कुंदा आधीच विवाहित होता. 2003 साली त्याने कविता नावाच्या मुलीशी लग्न केले होते. अर्थात हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत म्हणजे 2006 मध्ये कविता व राजचा घटस्फोट झाला. दुसºयाच वर्षी राज कुंदा शिल्पा शेट्टीसोबत लग्नबंधनात अडकला. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  राज आणि शिल्पा यांची एका परफ्यूमच्या प्रमोशनच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे बिझनेस पार्टनर बनले. त्यानंतर शिल्पा आणि राजच्या प्रेमकथेची चर्चा लगेचच मीडियात सुरू झाली होती. 

राजच्या पहिल्या पत्नीचे आरोप...राजने शिल्पा शेट्टीसोबत लग्न केल्यावर राजची पहिली पत्नी कविता हिने शिल्पावर अनेक आरोप केले होते. शिल्पा शेट्टीमुळेच माझा संसार मोडला. तिच्यामुळेच पतीने मला घटस्फोट दिला, असे आरोप तिने केले होते. काही दिवसांपूर्वीच कविताच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तिने शिल्पावर अनेक आरोप केले होते. हा व्हिडीओ पाहून राज कुंद्रा भडकला होता. ‘कविता माझ्या कुटुंबाला त्रास देत होती. माझे आई-वडिल, बहिण आणि तिचा पती आम्ही युरोपमध्ये असताना एकाच घरात राहात होतो. त्यावेळी तिने माझ्या बहिणीच्या पतीसोबत जवळीक वाढवली होती. तिचे आणि बहिणीच्या पतीचे संबंध होते. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील होते मात्र दोघांनी हे नाते स्वीकारायला नकार दिला. शेवटी वैतागून मी कविताला घटस्फोट दिला. या प्रकरणाशी शिल्पाचा काहीही संबंध नाही. ती उगाचच प्रसिद्धीसाठी तिला यामध्ये खेचत आहे. इतके दिवस मी शांत होतो कारण याबाबत मी काहीही बोलू नये अशी शिल्पाची इच्छा होती, असे तो म्हणाला होता.

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी