Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे प्रियंका चोप्रासोबत फोटोत दिसणारी छोटी मुलगी?, दोघांमध्ये आहे स्पेशल बॉण्डिंग

By तेजल गावडे | Updated: October 20, 2020 10:46 IST

प्रियंका चोप्राचे या छोट्या मुलीसोबत आहे स्पेशल बॉण्डिंग, जाणून घ्या त्यांच्या नात्याबद्दल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या प्रोफेशनल लाइफमुळे खूप बिझी असते. मात्र त्यातूनही वेळ काढून ती आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करत असते. प्रियंकाला सध्या तिच्या कुटुंबाची आठवण येते आहे. तिने तिची मैत्रीण दिव्या ज्योतीची मुलगी आणि तिची भाची स्काई कृष्णा सोबतचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रियंका चोप्राने भाची स्काई कृष्णासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात स्काई तिच्या खांद्यावर डोके टेकवून आराम करते आहे. तर प्रियंका मोबाइलमध्ये काहीतरी पाहताना दिसते आहे. फोटो शेअर करत तिने घराची आठवण येत असल्याचे सांगितले. स्काई कृष्णा आणि दिव्या ज्योती यांना टॅग करत तिने लिहिले की मिस होम.

स्काईसोबत प्रियंकाचे स्पेशल बॉण्डिंग आहे. स्काईची आई दिव्या ज्योती प्रियंकाची लाँग टाइम स्टायलिस्ट आणि फ्रेंड आहे. या नात्याने प्रियंका स्काईची मावशी आहे आणि स्काई तिची भाची. लॉकडाउननंतर प्रियंका त्यांना भेटली आहे. स्काईसोबत मस्ती करताना प्रियंकाने आधीदेखील फोटो शेअर केले आहेत. आता जेव्हा प्रियंका घरापासून दूर आहे तर अशात कुटुंबाची आठवण येणे स्वाभाविक आहे.

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच व्हाइट टायगर सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटातून ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

प्रियंकाने या चित्रपटातील काही सीन्स शेअर केले होते आणि यातील तिची भूमिका पिंकी मॅडमबद्दल सांगितले होते.

 

टॅग्स :प्रियंका चोप्राराजकुमार राव