Join us

​‘बेफिक्रे’मधील चार्मिंग बँकर आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 20:11 IST

रणवीर सिंग व वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफिक्रे ’ हा चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर घोडदौड ...

रणवीर सिंग व वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफिक्रे ’ हा चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर घोडदौड सुरू आहे. ‘बेफिक्रे’मध्ये वाणी व रणवीरच्या अभिनयासह आणखी एका अभिनेत्याची चर्चा होत आहे. हा अभिनेता म्हणजे ‘बेफिक्रे’मध्ये दुसरी महत्त्वाची भूमिका साकारणार अरमान रेहलान. अरमानने या चित्रपटात यंग व चार्मिंग बॅकरची भूमिका साकारली आहे. ‘बेफिक्रे’मध्ये मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले आहे. पण, हा चार्मिंग बँकर आहे तरी कोण?लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न अरमानने पाहिले होते. याकडे त्याने वाटचाल सुरू केली होती. आदित्य चोपडा यांनी ‘बेफिके्र’ या चित्रपटात अरमानला एक महत्त्वाची भूमिका दिली. या भूमिकेत तो चांगलाच फिट बसला असून त्याच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. त्याचा अभिनय महत्त्वकांक्षा दर्शविणारा असल्याचे मत व्यक्त केल जात आहे. अरमानने आपले शिक्षण मुंबईतील ख्यातनाम कॅ थ्रेड्रल स्कूलमधून पूर्ण केले आहे. अभिनेता व्हायचे हे ठरविल्याने अरमानने आपला प्रवास त्या दिशेने वळविला. बॉलिवूडमध्ये करिअर करायचे असेल तर चित्रपट निर्मिती यावी हा विचार घेउन त्याने थेट न्यूयॉर्क गाठले. चित्रपट निर्मितीसाठी स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या न्यूयार्क फिल्म अकादमीमधून त्याने प्रशिक्षण घेतले.न्यूयॉर्कमध्ये प्रशिक्षण घेत असताना अरमानमध्ये अभिनयाचे गुण असल्याचे त्याच्या वर्गमित्राच्या लक्षात आले. येथून त्याचा अभिनयाचा प्रवास खºया अर्थाने सुरू झाला. हे त्याच्या अभिनयाच्या प्रेमाचे प्रतिक असल्याचे तो मानतो. कोण आहे अरमान रेहलानहिंदी चित्रपट निर्माते ओ.पी. रेहलान यांचा नातू असलेल्या अरमानने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सुरुवात करण्याआधी प्रचंड मेहनत घेतली आहे. न्यूयॉर्क हून परत आल्यावर अनुपम खेर यांच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतले. त्याने नीरज काबी व कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरिया यांच्या कार्यशाळांत सहभागी झाला. बॉलिवूडमध्ये आश्वासक सुरुवात केली आहे. ओ.पी. रेहलान यांनी फुल और पथ्थर (१९६३), गहेरा दर्द (१९६३), तलाश (१९६९), हलचल (१९७१) या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.