Join us

ऐश्वर्या राय बच्चन कोणाची आहे गुलू मामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 06:30 IST

ऐश्वर्याचे माहेरीदेखील खूप कौतूक होते. तिथे ती मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांची लाडकी आहे.

ठळक मुद्देऐश्वर्या सासरी सर्वांची आवडती सून माहेरीदेखील ऐश्वर्याचे होते खूप कौतूक

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनबद्दल तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून कौतूकच ऐकायला मिळतात. अभिषेक बच्चनपासून अमिताभ बच्चनपर्यंत सगळेच तिची प्रशंसा करत असतात की ती कशापद्धतीने घर व काम मॅनेज करते.

ऐश्वर्या सासरी सर्वांची आवडती सून आहे. मात्र तिच्या माहेरीदेखील तिचे खूप कौतूक होते. ती तिच्या माहेरी फक्त मोठ्या सदस्यांचीच नाही तर छोट्या सदस्यांची पण लाडकी व्यक्ती आहे. हा राज स्वतः ऐश्वर्याची वहिनी श्रिमा रायने सांगितला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ऐश्वर्याचा भाऊ आदित्य रायची पत्नी श्रीमा राय यांनी सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग' या फिचरवर चाहत्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना श्रीमाने ऐश्वर्याच्या माहेरच्या टोपन नावाचा खुलासा केला आहे. ऐश्वर्याला विहान आणि शिवान हे दोन भाचे आहेत. ते तिला 'गुलु मामी' याच नावाने हाक मारतात, असे श्रीमाने सांगितले.एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या अक्षय कुमार आणि रजनीकांतच्या २.०मध्ये विशेष भूमिका साकारणार आहे. तिने रजनीकांतसोबत 'रोबोट' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याशिवाय ती अभिषेक बच्चन सोबत 'गुलाबजामून' या चित्रपटातही झळकणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन