Join us  

 ‘चेहरे’च्या पोस्टर्समधून का गायब आहे रिया चक्रवर्ती चेहरा? निर्मात्याने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:09 PM

अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी स्टारर ‘चेहरे या आपल्या आगामी सिनेमात रिया चक्रवर्तीची वर्णी लागली होती. मात्र ‘चेहरे’च्या पोस्टर्सवरून रियाचा चेहरा गायब दिसतोय.

ठळक मुद्देगेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या  प्रकरणानंतर रिया अचानक चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे, सुशांत व रिया रिलेशनशिपमध्ये होते.

अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी स्टारर ‘चेहरे या आपल्या आगामी सिनेमात रिया चक्रवर्तीची वर्णी लागली होती. मात्र ‘चेहरे’च्या पोस्टर्सवरून रियाचा चेहरा गायब दिसतोय. एकाही पोस्टरमध्ये तिचा चेहरा नाही. इतकेच नाही, प्रमोशनल कॅम्पेनमधून रिया चक्रवर्तीचे नाव गायब आहे. साहजिकच या सिनेमात रिया आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता ‘चेहरे’चे निर्माते आनंद पंडित यांनी यावर उत्तर दिले आहे. अर्थात हे उत्तर असे की, त्यातून काहीही हाती लागू नये.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘चेहरे’मध्ये रिया चक्रवर्ती आहे की नाही? असा थेट सवाल आनंद पंडित यांना विचारला गेला. मात्र यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. ‘ रिया चक्रवर्तीबद्दल काहीही न बोलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. योग्य वेळ आली की, आम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ. सध्या मी यावर काहीही बोलू शकत नाही,’ असे ते म्हणाले.

‘चेहरे’ची घोषणा झाली त्यावेळी या सिनेमाच्या लीड कास्टमध्ये अमिताभ, इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्तीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीनेअगदी या सिनेमातील तिचा फर्स्ट लूकही शेअर केला होेता. पण पोस्टरमध्ये रिया कुठेही नाही.

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या  प्रकरणानंतर रिया अचानक चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे, सुशांत व रिया रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची तपास यंत्रणांनी कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान ड्रग प्रकरण समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली खरी. पण बॉलिवूडमध्ये तिचे कमबॅक होणार का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.  

टॅग्स :रिया चक्रवर्तीचेहरे