हमने कहाँ पलट..पलट..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:14 IST
जाहीरातीत एका मुलीला पटवण्यासाठी आमीर खान चक्क शाहरूख खानचा डायलॉग म्हणताना दिसतो आहे. तुम्ही काय विचार करताय की खरंच ...
हमने कहाँ पलट..पलट..
जाहीरातीत एका मुलीला पटवण्यासाठी आमीर खान चक्क शाहरूख खानचा डायलॉग म्हणताना दिसतो आहे. तुम्ही काय विचार करताय की खरंच तो कुठल्या मुलीला पटवतोय का? तर नाही. आमीरला एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलसाठी ब्रँड अँम्बेसेडर करण्यात आले आहे. या शॉपिंग पोर्टलची एक सुंदर जाहीरात दाखवण्यात येत आहे. नुकतेच याची एक नवी जाहीरात आली आहे. ज्यात आमीर शाहरूखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चा डायलॉग बोलतांना दिसत आहे. आमीरसमोर एक मुलगी उभी आहे आणि तो म्हणतो की,' खडे रहे हम वो पलटी नही, हमने कहाँ पलट, पलट.' आमीर सध्या दंगल चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात तो पहलवानाची भूमिका साकारत आहे.