Join us

​सुशांत सिंह राजपूत लग्न कधी करणार? वाचा उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 15:34 IST

सुशांत सिंह राजपूत आता खूप पुढे निघून गेलाय. प्रोफेशनल लाईफमध्ये नाही तर पर्सनल लाईफमध्येही. अंकिता लोखंडेसोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांतचे नाव ...

सुशांत सिंह राजपूत आता खूप पुढे निघून गेलाय. प्रोफेशनल लाईफमध्ये नाही तर पर्सनल लाईफमध्येही. अंकिता लोखंडेसोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांतचे नाव सध्या क्रिती सॅनन हिच्याशी जोडले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्याही लिंकअपच्या बातम्या येत आहे. अर्थात सुशांत अद्याप काहीही बोलला नाही. तसाच एक्स गर्लफ्रेन्ड अंकिताबद्दलही तो बोलला नाही. पण शेवटी कधी ना कधी मनातले ओठांवर येतेच. झालेही तसेच. अलीकडे एका मुलाखतीत सुशांत याबद्दल बोलला.  माझ्याबद्दल रोज नव नव्या बातम्या येतात. कधी माझ्या ब्रेकअपच्या तर कधी लिंकअपच्या. पण मला कोणाला काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही.  उद्या मी बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता बनेन आणि त्यानंतर मी सर्वांना सगळे काही सांगेल, असेही काहीही नाही. मी अशा व्यवसायात आहे जिथे प्रत्येक दिवस नवीन असतो, त्यामुळे मी भविष्याचा फार विचार करत नाही. माझ्याकडे तितका वेळही नाही. लोकांना माझ्याबद्दल काय बोलतात,याचा विचार करण्यात मी माझी ऊर्जा खर्च करू इच्छित नाही.   मला कुणी प्रश्न विचारला तर मी त्याचे खरे खरे उत्तर देतो. कारण लपवण्यासारखे माझ्याजवळ काहीही नाही, असे सुशांत म्हणाला.ALSO READ : ​सारा अली खान डेब्यूसाठी तयार! सुशांतसिंह राजपूतसोबत झाली स्पॉट ! !पूर्वाश्रमीचे प्रियकर चांगले मित्र होऊ शकतात का? असा प्रश्न सुशांतला विचारण्यात आला. आता विचारणाºयाचा इशारा सुशांत व अंकिताकडे होता, हे सांगणे नकोच. या प्रश्नाचे उत्तर देताना सुशांत म्हणाला की, ब्रेकअपनंतरही खूप चांगले मित्र असलेले अनेकजण मी पाहिले आहेत. हे नक्कीच शक्य आहे. तू लग्न कधी करणार,असा प्रश्न   त्याला विचारला गेला. यावर,मी आधीच सांगितलेयं की, मी भविष्याचा विचार करत नाही. लग्न कधीही होऊ शकतं किंवा होणार ही नाही, असे तो म्हणाला. आता यातून सुशांतला काय सांगायचेयं, ते मात्र आम्हाला ठाऊक नाही.