Join us  

बाजीगर या चित्रपटात ही अभिनेत्री दिसणार होती डबल रोलमध्ये, पण घडले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 7:16 PM

बाजीगर या चित्रपटात या प्रसिद्ध अभिनेत्री डबल रोलमध्ये दिसणार होत्या. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे.

ठळक मुद्देबाजीगर या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी मुख्य भूमिकेत असणार होत्या. त्या या चित्रपटात डबल रोल मध्ये दिसणार होत्या.

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ चित्रपटात शाहरुखसोबत काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होत्या. ‘बाजीगर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटात शाहरूख निगेटिव्ह भूमिकेत होता. त्याच्या या नकारात्मक भूमिकेची विशेष प्रशंसा झाली होती. अब्बास मस्तान दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच या चित्रपटातील सगळीच गाणी सुपर हिट झाली होती. 

बाजीगर या चित्रपटात शाहरुख इतकेच काजोल आणि शिल्पा शेट्टी या नायिकांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात काजोल आणि शिल्पा शेट्टी यांची वर्णी लागण्याआधी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार होत्या. या अभिनेत्री आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. पण या चित्रपटात या अभिनेत्री नायकावर भारी पडतील असे दिग्दर्शकाला वाटत असल्यानेच त्यांनी या चित्रपटात त्यांना न घेण्याचे ठरवले.

बाजीगर या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी मुख्य भूमिकेत असणार होत्या. त्या या चित्रपटात डबल रोल मध्ये दिसणार होत्या. पण श्रीदेवी शाहरुखच्या भूमिकेवर भारी पडू शकतात आणि त्यामुळे चित्रपटातील नायकाचे महत्त्व कमी होऊ शकते अशी भीती चित्रपटाच्या टीमला वाटत असल्याने श्रीदेवी यांना या चित्रपटात घेण्याचा बेत रद्द करण्यात आला आणि त्यांच्याऐवजी या चित्रपटात दोन नायिकांना एंट्री देण्यात आली आणि अशाप्रकारे या चित्रपटाच्या टीमममध्ये काजोल आणि शिल्पा शेट्टी यांची एंट्री झाली. 

टॅग्स :शाहरुख खानश्रीदेवीकाजोलशिल्पा शेट्टी