Join us  

'या' कारणामुळे सलमानला करायचं नाही लग्न; भाग्यश्रीसमोर केलं होतं कबूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 6:10 PM

Salman khan: सलमानने वयाची ५० पार केली आहे. मात्र, अद्यापही त्याने लग्न न केल्यामुळे वारंवार त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याचे चित्रपट जितके गाजतात तितकीच त्याची पर्सनल लाइफदेखील चर्चेत येत असते. यात अनेकदा त्याच्या लग्नाविषयी वा अफेअर्सविषयी चर्चा होताना दिसते.  सलमानने वयाची ५० पार केली आहे. मात्र, अद्यापही त्याने लग्न न केल्यामुळे वारंवार त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात. यामध्येच लग्नाविषयी त्याचं काय मत आहे हे अभिनेत्री भाग्यश्रीने (bhagyshree) एका मुलाखतीत सांगितलं.

वाइल्डफिल्म्स इंडियाने भाग्यश्रीचा एक जुना इंटरव्ह्यू युट्यूबवर शेअर केला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये  भाग्यश्रीने तिच्या वैवाहिक जीवनासोबतच मैंने प्यार कियाचा तिचा को अॅक्टर सलमान खान याच्या लग्नाविषयीदेखील भाष्य केलं. 'सलमानला चांगल्या मुलींना डेट करायला आवडत नाही', असं ती म्हणाली.

"एखाद्या चांगल्या मुलीने माझ्यावर प्रेम करावं असं मला अजिबात वाटत नाही," असं एकदा सलमान मला म्हणाला होता. त्यावर, "तू असं का म्हणतोस?," असं मी त्याला विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देत त्याने तो एक चांगला वा आदर्श मुलगा नसल्याचं त्याने सांगितलं."

"मला नाही वाटत मी एकाच व्यक्तीसोबत बराच काळ एकत्र राहू शकतो. मला लगेचच त्या नात्याचा कंटाळा येतो. त्यामुळे जोपर्यंत मला या गोष्टी नियंत्रणात आणता येत नाहीत. त्यामुळे लोकांनी माझ्यापासून दूरच रहावं. म्हणूनच मी कोणाला माझ्या फार जवळ येऊ देत नाही," असं सलमानने भाग्यश्रीला सांगितलं.

दरम्यान, १९९० ते २००० च्या काळात सलमानची लव्ह लाइफ चांगलीच चर्चेत  आली होती. यात सोमी अली, संगिता बिजलानी, ऐश्वर्या राय,कतरिना कैफ अशा कितीतरी अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे.

टॅग्स :सलमान खानभाग्यश्रीसेलिब्रिटीसिनेमा