Join us  

जेव्हा दीपिका पदुकोणची स्टाइल सलमानसाठी ठरली डोकेदुखी, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:24 AM

आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. त्यामुळे रिल लाइफमध्ये फॅशनिस्ट असणारी दीपिका रिअल लाइफमध्येही सुंदर दिसण्यासाठी तितकाच तामझाम करते.वेळोवेळी याची प्रचिती येतेच.

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळते. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री दीपिका पदुकोणचा.आपली अनोख्या स्टाइलनं आणि अभिनयाने बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणही नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. बॉलिवूड पार्ट्या असो किंवा मग पुरस्कार सोहळे. सर्वात जास्त चर्चा रंगते अभिनेत्रींच्या हटके स्टाइलचीच. 

अभिनयाप्रमाणेच दीपिका आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. अनेकदा तिच्या स्टायलिश लूकची चर्चा रंगत असते. पती रणवीर सिंग प्रमाणे हटके स्टाइल करत चर्चेत राहणे हे दीपिकालाही आवडतं.  दीपिका लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे.आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. त्यामुळे रिल लाइफमध्ये फॅशनिस्ट असणारी दीपिका रिअल लाइफमध्येही सुंदर दिसण्यासाठी तितकाच तामझाम करते.वेळोवेळी याची प्रचिती येतेच.

पुरस्कार सोहळ्यात तर कोण काय परिधान करणार? कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार? कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतात. बॉलीवुडची मस्तानी दीपिका पदुकोणनेही 'आयफा' पुरस्कार सोहळ्यात तिच्या हटके स्टाइलने सा-यांनाच चकीत केले होते.  आयफाच्या रेड कार्पेटवर हटके स्टाइल करत ती अवतरली आणि तिला पाहताच आपसुकच मीडियाच्या नजराही तिच्याकडेच वळाल्या होत्या. दीपिकाचा व्हायरल झालेला व्हिडीओ जुना असला तरी पुन्हा एकदा तिच्या स्टाइलचीच चर्चा रंगली आहे.

तिच्या हटके फॅशन सेन्सचं नेहमीच कौतुक होतं. पण आयफाच्यावेळी केलेली स्टाइल पाहून खुद्द सलमान खान सुद्धा आश्चर्यचकीत झाला होता. मीडियाशी संवाद साधण्यात दीपिका बिझी होती. त्याचदरम्यान सलमानची एंट्री होते. या सगळ्यांमध्ये त्याचेही लक्ष फक्त आणि फक्त दीपिकाने परिधान केलेल्या गाऊनवरच जाते. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून तुम्हालाही या गोष्टीचा अंदाज येईलच. आतमध्ये जाण्यासाठी सलमानला त्या ड्रेसमधून वाट काढत जावे लागले. त्यामुळे दीपिकाची स्टाइल पाहून थोडा सलमानही हैराण झाला होता. या पुरस्कार सोहळ्यामुळे रसिकांसह सलमानलादेखील दीपिकाच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना आली होती.

टॅग्स :दीपिका पादुकोणसलमान खान