Join us

​जेव्हा सचिन, अमिताभ, नागार्जुन सोबत येतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 15:08 IST

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या विनम्रतेसाठी प्रसिद्ध आहेत. एवढे मोठे सुपरस्टार असुनही सर्वांचा आदर करतात. आता हेच पाहा ना. ...

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या विनम्रतेसाठी प्रसिद्ध आहेत. एवढे मोठे सुपरस्टार असुनही सर्वांचा आदर करतात. आता हेच पाहा ना. एका कार्यक्रमानिमित्त त्यांची भेट मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्याशी झाली. यावेळी दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील लेजेंडरी अ‍ॅक्टर्स ममूटी आणि जयराम हेदेखील उपस्थित होते. एकाच छताखाली एवढे मोठे स्टार्स एकत्र आल्या म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. मग काय बिग बींनी ट्विटरवर या सर्वांसोबतच एक फोटो शेअर केला आणि सोबत लिहिले की, ‘ एकाच छाताखाली एवढ्या महान कलाकारांसोबत उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल मला गौरवान्वित वाटतेय.’                                                                अमिताभ आणि नागार्जुन यांनी ‘अग्नीवर्षा’, ‘काला पत्थर’ आणि ‘खुदा गवाह’ अशा सिनेमांत एकत्र काम केलेले आहे. तसेच एका जाहिरातीमध्येसुद्धा त्यांनीसोबत काम केलेले आहे.