पती राजेश खन्ना यांचे ‘हे’ गाणे कानी पडताच बेधुंद होऊन थिरकायला लागली डिम्पल कपाडिया, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 18:03 IST
दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील एक गाणे पत्नी डिम्पल कपाडियाच्या कानी पडताच ती थिरकायला लागली.
पती राजेश खन्ना यांचे ‘हे’ गाणे कानी पडताच बेधुंद होऊन थिरकायला लागली डिम्पल कपाडिया, पाहा व्हिडीओ!
अभिनेत्री डिम्पल कपाडियाचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा डिम्पलच्या कानावर पती राजेश खन्ना यांच्या एका मधुर गाण्याचे बोल पडतात तेव्हा ती लगेचच थिरकायला लागली. डिम्पल एवढी बेधुंद होऊन नाचते की, जणूकाही ती ७०च्या दशकात पोहोचली असावी. त्याचे झाले असे की, एका पार्टीसाठी डिम्पल गेटवर एंटर होताच तिच्या कानी ७०च्या दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना यांचे ‘जयजय शिवशंकर’ या गाण्याचे बोल पडतात. तेव्हा ती लगेचच थिरकायला लागली. पार्टीमध्ये डिम्पल आॅरेंज जॅकेटचा अटॅच कुर्ता परिधान करून पोहोचली होती. यावर तिने मेहरून रंगाची बॅग कॅरी केली होती. दरम्यान, दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये अभिनेत्री डिम्पलसोबत लग्न केले होते. त्यावेळी राजेश खन्ना डिम्पलपेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते. जेव्हा डिम्पलने राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले होते, त्यावेळी तिचे वय केवळ १६ वर्ष इतके होते. तर राजेश खन्ना यांचे वय ३१ वर्ष होते. डिम्पल आणि राजेश खन्ना यांची पहिली भेट अहमदाबाद येथे झाली. अहमदाबाद येथील नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. असे म्हटले जाते की, सुपरस्टार राजेश खन्ना त्यावेळी नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चीफ गेस्ट म्हणून गेले होते. त्याठिकाणीच ते डिम्पलच्या प्रेमात पडले. पहिल्याच भेटीत त्यांनी डिम्पलशी लग्न करण्याचे ठरविले होते.