Join us
Daily Top 2Weekly Top 5

43 वर्षापूर्वी सुपरहॉट अंदाजात फोटोशूट केले होते या मॉडेलने, या प्रसिद्ध अभिनत्रीची आहे आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:45 IST

प्रोतिमा यांनी लोकं काय म्हणतील ? काय विचार करतील? याचा फारसा जास्त विचार केला नाही. लोकांच्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही परिणाम देखील झाला नाही.

जेव्हाही भारतातील विवादास्पद कलाकारांचे नाव घेतले जाते त्यावेळी प्रोतिमा बेदी हे नाव येणार नाही असे होणारच नाही.  अगदी आजपासून जवळपास ४० वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही प्रोतिमा खूप चर्चेत असायच्या.

''पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा'' म्हणत सेलिब्रेटी कधी कधी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत पब्लिसिटी मिळवत असतात. हा ट्रेंड आत्ताचा नसून खूप जुना आहे. प्रोतिमा बेदी यांचे जुने फोटो पाहून याचा अंदाज तुम्हाला येईलच. अगदी चाळीस वर्षापूर्वी देखील सेलिब्रेटी आयडीयाची कल्पना लढवत प्रकाशझोतात राहायचे. ही बाब नृत्यांगणा प्रोतिमा बेदीबाबत तंतोतंत लागू पडते.

 

प्रोतिमा म्हणजे प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांची पहिली पत्नी आणि अभिनेत्री पुजा बेदीची आई अशी प्रोतिमा बेदी यांची ओळख आहे. प्रोतिमा बेदी यांचे इंटरनेट फोटो सर्च केले तर सगळे बोल्ड फोटोच लक्ष वेधून घेतील. अगदी त्या काळात  प्रोतिमाने  केलेले नग्न फोटोशूटसाठी केलेले धाडसाचे काहींनी टिका केली तर काहींनी स्तुती देखील केली होती. 

मात्र प्रोतिमा यांनी लोकं काय म्हणतील ? काय विचार करतील?  याचा फारसा जास्त विचार केला नाही. लोकांच्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही परिणाम देखील झाला नाही. इतकच नाहीतर मासिकासाठी बीचवर चक्क नग्न फोटोशूट करून त्यांनी तुफान खळबळ माजवली होती. हे धाडस केवळ प्रोतिमाच करू शकल्या. मासिकाला हिट करण्यासाठी सिनेब्लिट्झची टीम विवस्र होऊन बीचवर धावणा-या मॉडेलच्या शोधात होती.

 

मात्र त्यासाठी त्या काळात कोणतीही मॉडेल हे करण्यास धजावणार नव्हती. 'सिनेब्लिट्झ' मासिकाच्या संपादिका रुसी यांनी प्रोतिमा यांचे नाव पुढे केले. प्रोतिमा यांना याबद्दल विचारले असता त्यांनीही ते मान्य केले होते.