Join us  

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला साकारायची होती धोनीची व्यक्तिरेखा,पण सुशांतला देण्यात आली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 4:58 PM

'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' या सिनमाने जवळजवळ 133 कोटींची कमाई केली होती. सिनेमाचे बजेट 80 कोटी होती, त्यातील 40 कोटी धोनीला देण्यात आले होते.

कुणीही गॉडफादर नसताना जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मोजकेच असतात. त्यापैकीच सुशांत हा अतिशय हरहुन्नरी कलाकार होता. आधी छोटा पडदा गाजवणारा आणि मग रुपेरी पडद्यावर अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे सुशांतसिंह राजपूत. 'काय पो छे' या सिनेमातून त्याने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमातही त्याने भूमिका साकारल्या. टीम इंडियाचा वर्ल्डकप विजेता कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावरील सिनेमात त्याने धोनीची भूमिका साकारली होती. सुशांतचे या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. सुशांतसिंह राजपूत हा तरुणाईचा लाडका अभिनेता बनला.  'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा सुशांतसाठी ख-या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरला. 

सिनेमासाठी जेव्हा कास्टिंग करण्यात येत होते तेव्हा खिलाडी अक्षय कुमारला धोनीची भूमिका साकारायची इच्छा होती, त्यामुळे त्यावेळी अक्षय कुमारही या भूमिकेसाठी दिग्दर्शकाच्या डोक्यात होता. पण दिग्दर्शक नीरज पांडेंला धोनी आणि त्याच्या लुकमध्ये बरीच असमानता जाणवली. त्यामुळे त्यांनी अक्षयच्या जागी सुशांतलाच कास्ट करणे पसंत केले. 

भूमिकेसाठी सुशांतच अगदी परफेक्ट वाटला आणि त्यांनी सुशांतला साइन केले. हे पात्र सुशांतच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरले आणि हा पुढे  हिट ठरला.2016 मध्ये सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांच्या यादीत  पाचव्या क्रमांकावर होता. या सिनमाने जवळजवळ 133 कोटींची कमाई केली होती. सिनेमाचे बजेट 80 कोटी होती, त्यातील 40 कोटी धोनीला देण्यात आले होते.

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला...! बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोपसुशांत शिस्तबद्ध आयुष्य जगत होता. त्याच्यासारखा तरूण कधीच आत्महत्या करणार नाही. हे एक खूप मोठे चक्रव्युह आहे. यात तरूण पिढीला फसवून उद्धवस्त केले जाते. एखाद्याची प्रगती होत असलेली पाहून त्याला व्यसनांच्या चक्रव्युहात ओढले जाते. आपल्याला देशाला अशा प्रवृत्तींपासून वाचवायला हवे, असे रामदेवबाबा म्हणाले, एनसीबी करत असलेल्या तपासावर त्यांनी समाधान व्यक्त केले. एनसीबी लवकरच ख-या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअक्षय कुमार