Join us  

शाहरुखच्या बहिणीची भूमिका ऑफर होताच काजोलने दिली होती अशी प्रतिक्रिया..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:43 AM

शाहरुख खान आणि काजोल यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावते. शाहरुख आणि काजोलच्या जोडीने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत.

ठळक मुद्देशाहरुख आणि काजोलच्या जोडीने 90चे दशक गाजवले होते. 'जोश' सिनेमात काजोलला शाहरुखच्या बहिणीची भूमिका ऑफर झाली होती

शाहरुख खान आणि काजोल यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावते. शाहरुख आणि काजोलच्या जोडीने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का की, काजोलला सिनेमात शाहरुखच्या बहिणीची भूमिका ऑफर करण्यात आली होती मात्र तिने नकार दिला.   

शाहरुख आणि काजोलच्या जोडीने 90चे दशक गाजवले होते. बॉक्स ऑफिसवर त्यांचे अनेक सिनेमा हिट झाले होते. 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे', 'करन-अर्जुन', 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम'सारखे अनेक सुपरहिट सिनेमा या जोडीने दिले.   2000 मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या 'जोश'मध्ये काजोलला त्याच्या बहिणीचा रोल ऑफर करण्यात आला होता. काजोल यासाठी स्पष्टपणे नकार दिला. काजोलला कोणताही प्रयोग करायचा नव्हता.  काजोलने नकार दिल्यानंतर ही भूमिका ऐश्वर्याने साकारली होती.  

काजोलचा सिनेमांबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच  'हेलिकॉप्टर ईला'मध्ये दिसणार आहे.यात काजोल एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे जिची गायिका होण्याची इच्छा असते. आई- मुलाच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. 'हेलीकॉप्टर ईला' ही एक मॉर्डन आई आणि तिच्या एकुलत्या एक मुलाची हटके कहाणी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्य आयुष्याच्या फार जवळची वाटते. जबाबदार आईबरोबरच एका महत्वाकांक्षी गायिकेच्या रुपात काजोलला या सिनेमात पाहता येणार आहे. या गंभीर आणि नाजूक विषयाला अत्यंत मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. यात काजोल, रिद्धिसोबत नेहा धूपियाचीही महत्त्वाची भूमिका आहे. 'हेलिकॉप्टर ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे. 

टॅग्स :शाहरुख खानकाजोल