Join us  

जया बच्चन यांच्या 'या' गोष्टीमुळे सून ऐश्वर्यासोबच उडतात खटके, म्हणूनच राहतात दूर-दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 12:27 PM

लग्नानंतर ऐश्वर्या सिनेमांपासून लांब गेली. त्यानंतर लेकीसाठी करियरला काही काळापुरता अल्पविराम देऊन बच्चन बहू ऐश्वर्यानं बॉलीवुडची सुपरमॉम असल्याचं दाखवून दिलंय..

''तुझं माझं जमेना, सासू शिवाय करमेना'' अशीच काहीशी अवस्था बच्चन बहू ऐश्वर्याचीही झाली आहे. लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक हे वेगळेच राहतात. कामातून वेळ मिळाला तर अभिषेक ऐश्वर्या जया बच्चन आणि अमिताभ यांना आवर्जुन भेटायला जातात. तसेच सगळे सणासुदीला कुटुंब एकत्र सेलिब्रेशन करताना दिसतात. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये चांगले ट्यूनिंग असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. 

वेळोवेळी जया बच्चन आपल्या सुनेबद्दल मनमोकळेपणाणे कौतुक करताना पाहयला मिळायचे.मात्र आता यांच्यातही काही गोष्टींमुळे कटुता निर्माण झाली की काय अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. या सासू सुना आता क्वचितच एकत्र पाहायला मिळतात. असे म्हटले जाते की ऐश्वर्या जया बच्चनच्या सवयीमुळे अस्वस्थ झाली होती आणि एका घटनेनंतर  या दोघांधला दुरावा जास्त वाढत गेला.

जया बच्चन यांच्या रागाची जाणीव सर्वांनाच आहे. बर्‍याचदा माध्यमांसमोरही तो दिसला आहे. एकदा असे झाले जेव्हा एका पत्रकाराने ऐश्वर्याला आदराने संपूर्ण नाव घेताच ऐश म्हणून आवाज दिला.  मुळात ऐश याच नावाने तिला बोलवतात. त्यामुळे ऐश्वर्यालाही ते आवडतत असावे. मात्र ही बाब जया बच्चन यांना अजिबात आवडत नाही. त्यांनी तिथेच त्या पत्रकाराला खडे बोल सुनावले. यादरम्यान ऐश्वर्या मात्र खूप अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. यावरून जया बच्चन यांचे कुठेही ऐश्वर्याच्या कामात बोलणे तिला चांगलेच खटकले असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.

लग्नानंतर ऐश्वर्या सिनेमांपासून लांब गेली. त्यानंतर लेकीसाठी करियरला काही काळापुरता अल्पविराम देऊन बच्चन बहू ऐश्वर्यानं बॉलीवुडची सुपरमॉम असल्याचं दाखवून दिलंय.. आता तर ऐश आपली लेक आराध्याला तिचं बालपण एन्जॉय करता यावं यासाठी प्रयत्न करते...आराध्याला घरी एकटं वाटू नये यासाठी ऐश तिला रोज संध्याकाळी आपल्या आईच्या घरी नेते... तिथं ऐश आपले भाचे आणि पुतण्यांना त्यांचा होमवर्क पूर्ण व्हावा यासाठी मदत करते...त्यांच्याशी ती लहान होऊन खेळते.. बच्चन बहून बनण्यात कितपत यशस्वी झाले हे सांगणे जरा कठिणच असले तरी सुपर मॉम बनण्यात ऐश्वर्याने कुठलीही कमी ठेवलेली नाही. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनजया बच्चन