Join us  

जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखाचा रोमँटीक सीन पाहून ढसाढसा रडल्या होत्या जया बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:55 PM

रेखा यांच्याशी अमिताभ यांची जवळीक पाहून जया बच्चनही चिंतेत होत्या. जया आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यावरही त्याचा परिणाम होत होता.

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे. रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यातही महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. बिग बींवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि किंबहुना आहे. मात्र हे वास्तव त्यांनी आजवर कधीही स्वीकारलं नाही. 

 ‘ दो अनजाने ‘ सिनेमात रेखा अमिताभ यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. रसिकांनाही जोडी प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती. या सिनेमानंतर दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती.  निर्माते दिग्दर्शकांनाही रेखा आणि अमिताभ यांनी एकत्र त्यांच्या सिनेमात काम करावे अशी ईच्छा असायची. सुपरहिट ठरलेली जोडी अनेक सिनेमात एकत्र झळकली खरी मात्र जया बच्चन यांना रेखासोबत अमिताभ यांचे काम करणे खटकत होते. 

'मुक्कदर का सिकंदर' सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी जयाबच्चनही उपस्थित होत्या.सिनेमाचे स्क्रिनिंग सुरु झाले आणि दोघांचाही एक रोमँटीक सीन सुरु झाला.हा सीन पाहून जया बच्चन खूप निराश झाल्या. इतक्या की त्यांना स्वःचे अश्रु रोखणेही कठिण झाले होते. तिथेच त्या ढसाढसा रडू लागल्या. हा सीन पाहून  दिग्दर्शक निर्मांत्यांना रेखा ज्या सिनेमात असेल त्या सिनेमात अमिताभ बच्चन काम करणार नसल्याचे सांगून टाकले.

 

रेखा यांच्याशी अमिताभ यांची जवळीक पाहून जया बच्चनही चिंतेत होत्या. जया आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यावरही त्याचा परिणाम होत होता. वैवाहीक आयुष्यात रेखा यांच्यामुळे समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेवटी अमिताभ यांनीच कठोर पाऊले उचलत रेखा यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. नुकतेच अमिताभ आणि जया बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा ४७ वा वाढदिवस साजरा केला होता. 

टॅग्स :जया बच्चनरेखा