Join us  

ऐकावं ते नवलंच, शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यावर फतिमा सना शेख इतकी भारावली होती की,दिवसभर धुतले नव्हते हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 5:58 PM

फातिमा पहिल्यांदा दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुखला भेटली होती. या पार्टीचे आयोजन आमिर खानने केले होते.

रोमान्सचा बादशाह आणि बॉलीवुडचा किंग शाहरुख खानचे कित्येक फॅन्स आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात शाहरुखचे फॅन्स पसरलेत. त्याच्या प्रत्येक फॅन्सची काही ना काही खास बात आहे. सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. किंग खान शाहरुखचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. जगभरातून चाहते शाहरुखच्या फोटोंवर प्रेमाच वर्षाव करत असतात.

 

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटी मंडळीदेखील शाहरुखवर जीव ओवाळून टाकतात.अभिनेत्री फातिमा सना शेखही शाहरुखची मोठी फॅन आहे.दिलेल्या एका मुलाखतीत तिने शाहरुखला पहिल्यांदाच भेटली त्यावेळचा किस्सा सांगितला. शाहरुखला भेटली तेव्हा ती खूप भारावून गेल्याचे तिने सांगितले. तिचा फॅन मोमेंट सांगत असताना ती शाहरुखची किती मोठी चाहती आहे याचीही सा-यांनाच प्रचिती आली.

फातिमा पहिल्यांदा दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुखला भेटली होती. या पार्टीचे आयोजन आमिर खानने केले होते. खुद्द आमिर खाननं फातिमाची शाहरुख खानसह ओळख करुन दिली होती. शाहरुखसह गप्पा मारताना फातिमाचा हात चुकून शाहरुखला लागला. शाहरुखला हात काय लागला म्हणून फातिमा त्या दिवशी भलतीच खुश होती. तो क्षण तिच्यासाठी खूप खास होता. कायमच तो क्षण लक्षात राहिल असेही तिने सांगितले. शाहरुखला तिचा हात लागला याच आनंदाच्याभरात तिने संपूर्ण दिवस हातच धुतला नव्हता. 

फातिमा सना शेख ही बॉलिवूड अभिनेत्री आहे.‘चाची420’मध्ये ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ सिनेमात तिने महावीर सिंग फोगट यांची मुलगी गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती. शाहरुखची मोठा चाहती असलेली फातिमाने 'वन टू का फोर' सिनेमात बालकलाकार म्हणून शाहरुखसह कामही केले आहे तरीही ती शाहरुखला भेटण्यासाठी आजही तितकीच उत्सुक असते.

टॅग्स :फातिमा सना शेखशाहरुख खान