Join us

जेव्हा बेबो आईस्क्रीम खाते...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 22:45 IST

करिना कपूरला आईस्क्रीम खाणे बेहद आवडते. शाळेत असताना तिला मिळणाºया पॉकेटमनीतून ती आईस्क्रीम खाण्यासाठीच सर्व पैसे वापरायची असे ती ...

करिना कपूरला आईस्क्रीम खाणे बेहद आवडते. शाळेत असताना तिला मिळणाºया पॉकेटमनीतून ती आईस्क्रीम खाण्यासाठीच सर्व पैसे वापरायची असे ती सांगते. कधीकधी आईपासून लपून ती आईस्क्रीम खात असे. ती म्हणते, सैफलाही आईस्क्रीम खुप आवडते. त्याला तर आठवण करून द्यावी लागते की, सैफ तू अगोदरच दोन संपवले आहेस. यानंतर तू खाऊ शकत नाहीस. ’ त्यानंतर तिला विचारण्यात आले की, असे म्हटले जाते की, गोड खाल्ल्यास वजन वाढते तर मग?तेव्हा ती म्हणते,‘ माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही असे म्हणाल का? खरंतर आपल्याला जे आवडते ते आपण करायलाच हवे. ते त्वचा आणि हृदयासाठी चांगले असते. तुमचा मुड त्यामुळे बनून जातो. फक्त व्यायाम करा म्हणजे तुम्ही कितीही गोड खाऊ शकता.’ १ एप्रिल रोजी अर्जुन कपूरसोबतचा तिचा चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ रिलीज होतोय.