Join us  

करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन फक्त ‘स्टार्स’सोबत काम करते...! जेव्हा आयुष्यमान खुराणाला आला होता असा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:39 AM

Viral: अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या एका मुलाखतीचा एक भाग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. 

ठळक मुद्दे कालपरवा अभिनेत्री कंगना राणौतने करण जोहर गँगवर उघडपणे आरोप केले होते. 

सुशांत सिंग राजपूत जगातून गेला पण जातांना अनेक प्रश्न मागे सोडून गेला. सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी पडला, असे आता अनेकजण उघडपणे बोलत आहेत. तूर्तास याला काहीही आधार नाही. मात्र सोशल मीडियावर यानिमित्ताने काही लोकांवर उघडउघड आरोप होत आहेत. करण जोहर व त्याची गँग तर प्रचंड ट्रोल होतेय. करण जोहर व त्याच्या गँगने सुशांत सारख्या अनेकांना बॉलिवूडमध्ये मोठे होऊ दिले नाही, त्यांना काम मिळू नयेत म्हणून प्रयत्न केलेत, असे एक ना अनेक आरोप ऐकायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या एका मुलाखतीचा एक भाग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या मुलाखतीत आयुष्यमान करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनबद्दल बोलला होत. ‘आम्ही फक्त स्टार्ससोबत काम करतो,’ असे धर्मा प्रॉडक्शनने म्हटले होते.

त्या मुलाखतीत आयुष्यमान त्याच्या स्ट्रगलबद्दल बोलला होता. तो म्हणाला होता की, ‘एका अवार्ड फंक्शनमध्ये मी करण जोहरला भेटलो होतो. करणला मी त्याचा नंबर मागितला होता आणि करणने त्याचा लँडलाइन नंबर दिला होता. करणने मला भाव दिला म्हणून मी खूश होतो.आता आपली लाईफ सेटल आहे, मी करण जोहरसोबत काम करणार, या विचाराने मी खूश होतो. दुस-याच दिवशी करणने दिलेल्या मी त्या लँड लाइन नंबरवर फोन केला. मात्र करण ऑफिसमध्ये नाही, असे मला सांगण्यात आले. यानंतर मी पुन्हा एकदा फोन केला, यावेळीही तो बिझी आहे, असे सांगून फोन ठेवला गेला. मी पुन्हा कॉल केल्यावर मात्र फोन उचलणारा माझ्यावर चांगलाच भडकला. आम्ही फक्त स्टार्ससोबत काम करतो, तुझ्यासोबत नाही, असे उद्धटपणे म्हणत त्याने फोन ठेवला. ’

आयुष्यमानची ही मुलाखत मीडियात छापून आली होती. त्याच्या या मुलाखतीचे स्क्रिनशॉट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी हे स्क्रिनशॉट्स व्हायरल करत सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. कालपरवा अभिनेत्री कंगना राणौतने करण जोहर गँगवर उघडपणे आरोप केले होते. इंडस्ट्रीतील मुव्ही माफियांमुळे सुशांत सिंगचा बळी गेला. त्याची आत्महत्या नसून प्लान मर्डर असल्याचे तिने म्हटले होते.

टॅग्स :आयुषमान खुराणाकरण जोहरसुशांत सिंग रजपूत