Join us  

गरब्याबद्दल सलमान खानला विचारले असता त्याला आली 'या' गाण्याची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 5:16 PM

सलमान खानच्या बॅनर अंतर्गत सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्माला लाँच करत आहे. 'लवयात्री' असे आयुषच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात वरीना हुसैन ही नायिका मुख्य भूमिकेत आहे. वरीनाचा देखील हा पहिला चित्रपट आहे.

ठळक मुद्देसलमानला आली 'ढोली तारो' या गाण्याची आठवणलवरात्री हा सिनेमा ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खानच्या बॅनर अंतर्गत सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्माला लाँच करत आहे. 'लवयात्री' असे आयुषच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात वरीना हुसैन ही नायिका मुख्य भूमिकेत आहे. वरीनाचा देखील हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानने नूकतेच पत्रकारांसोबत संवाद साधला.

'लवरात्री' या चित्रपटात प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार असून नवरात्रीच्या गरबाच्या निमित्ताने नायक आणि नायिकेची भेट होते असे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गरबा हा या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने तू कधी गरबा खेळायला जायचा का असे सलमानला विचारले असता त्याने खूपच छान उत्तर दिले. एवढेच नव्हे तर या निमित्ताने त्याला त्याच्या एका सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील एका गाण्याची आठवण आली.सलमानने 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याची जोडी ऐश्वर्या राय सोबत जमली होती. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. गरब्याच्या निमित्ताने त्याला याच चित्रपटातील 'ढोली तारो' या गाण्याची आठवण आली.गरबा या खेळाच्या आठवणीविषयी सलमान सांगतो, आमच्या घरात सगळेच सण अतिशय आनंदात साजरे केले जातात. मी माझ्या कॉलेजच्या दिवसात गरबा खेळायला आवर्जून जायचो. तसेच गरब्याचा विषय निघाला की मला हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील 'ढोली तारो' हे गाणे नक्कीच आठवते.सलमान खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावालाने केले आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला लवयात्री एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. लवरात्री हा सिनेमा ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

 

टॅग्स :लवरात्रिसलमान खानआयुष शर्मा