Join us

अनुष्का शर्मा जेव्हा रणबीर कपूरला म्हणाली होती तरूणांचा सोनम कपूर, पण का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 13:50 IST

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरचे एकमेकांसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे आणि जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ते एकमेकांचे पाय खेचण्याची एकही संधी सोडत नाहीत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरने ऐ दिल है मुश्किल चित्रपटात काम केले होते. चित्रपटात ऐश्वर्या रायदेखील मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाची कथा लोकांना खूप भावली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाबद्दल फक्त बोलले गेले नाही तर चित्रपटातील कलाकारांनी एकमेकांशी निगडीत किस्से देखील शेअर केले होते. या दरम्यान एका चॅट शोमध्ये अनुष्का शर्मानेरणबीर कपूरला तरूणांचा सोनम कपूर म्हटले होते.

ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचे बरेचसे शूटिंग पॅरिसमध्ये झाले होते जे शॉपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा रणबीरला विचारण्यात आले की पॅरिसमध्ये ऐश्वर्या आणि अनुष्का या दोघांपैकी कोणी जास्त शॉपिगसाठी थांबवले होते त्यावर अनुष्का म्हणाली होती की, सर्वात जास्त शॉपिंग रणबीर कपूरच करत होता. तो खरोखरच तरूणांचा सोनम कपूर आहे. खरेतर सोनम कपूरला देखील शॉपिंग करायला खूप आवडते आहे आणि ती कुठेही जाते तिथे खूप शॉपिंग करते आहे. त्यामुळे अनुष्काने रणबीरला सोनम कपूर असे संबोधले होते. 

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरचे एकमेकांसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे आणि जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ते एकमेकांचे पाय खेचण्याची एकही संधी सोडत नाही. हे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान असे बऱ्याचदा करताना दिसतात.

ऐ दिल है मुश्किल चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूरने एकत्र काम केले होते आणि यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. 

टॅग्स :रणबीर कपूरअनुष्का शर्माऐश्वर्या राय बच्चन