बॉलिवूड अभिनेता अजय देवगण(Ajay Devgan)चा बहुप्रतिक्षित सीक्वल 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2 Movie) अखेर आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच बरीच चर्चा होती. आता चाहते हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की हा विनोदी ड्रामा सिनेमा थिएटरनंतर ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होईल? 'सन ऑफ सरदार २' या सिनेमाच्या पोस्टरमध्ये असे म्हटले की थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. सध्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.
दरम्यान, सुनील शेट्टी ज्यांनी त्यांचा मुलगा अहान शेट्टी आणि अजय देवगण यांच्यासोबत लंडनमध्ये सन ऑफ सरदार २ पाहिला होता, त्याने त्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. अजय देवगणच्या अभिनयाचे कौतुक करताना त्याने या चित्रपटाला "हास्याची दंगल" म्हटले आणि म्हटले की, फक्त अजयच हा चित्रपट इतक्या उत्साहाने आणि वेडेपणाने सादर करू शकतो. त्याने सांगितले की, असा चित्रपट बनणे दुर्मिळ आहे ज्यामध्ये अनेक पिढ्यांचे प्रेक्षक एकत्र हसतात.
मल्टीस्टारर चित्रपट 'सन ऑफ सरदार २'अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात 'रेड २' अभिनेता अजय देवगण जस्सी रंधावाची भूमिका साकारली आहे. तर 'सीता रामम' अभिनेत्री मृणाल ठाकूर सुखच्या भूमिकेत आहे. याशिवाय 'सन ऑफ सरदार २'मध्ये रवी किशन, कुब्रा सैत, संजय मिश्रा, चंकी पांडे, नीरू बाजवा, विंदू दारा सिंह, दीपक डोब्रियाल, शरत सक्सेना, अश्विनी काळसेकर आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'धडक २' सोबत टक्कर दिली आहे. विजय कुमार अरोरा दिग्दर्शित हा चित्रपट अजय देवगण, ज्योती देशपांडे, एन.आर. पचिसिया आणि प्रवीण तलरेजा यांनी सहनिर्मिती केली आहे.