Join us  

...जेव्हा अमिषा पटेलने संजय दत्तवर लावला होता छेडछाडीचा आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 9:18 AM

अभिनेता संजय दत्त याचे करिअर जेवढे यशस्वी राहिले आहे, तेवढेच त्याचे खासगी जीवन वादग्रस्त राहिले आहे. संजय दत्तने त्याच्या ...

अभिनेता संजय दत्त याचे करिअर जेवढे यशस्वी राहिले आहे, तेवढेच त्याचे खासगी जीवन वादग्रस्त राहिले आहे. संजय दत्तने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. विशेष करून त्याची ‘जादू की झप्पी’ आणि ‘गांधीगिरी’ने सर्वांनाच संजूबाबाजवळ नेले. त्यामुळेच आजही संजूबाबाचे नाव टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीत घेतले जाते. संजूबाबाने त्याच्या करिअरमध्ये विविध स्वरूपांच्या भूमिका साकारल्या आहेत. अशात त्याने अनेक अभिनेत्रींसोबत कामही केले आहे. जवळपास प्रत्येक अभिनेत्रीसोबत त्याचे चांगले नाते आहे. मात्र एक अभिनेत्री अशीही आहे, जिने त्याच्यावर छेडछाडीचा आरोप लावला आहे. होय, हा किस्सा २००२ चा आहे. त्यावेळी दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा आणि वरून धवनचा भाऊ रोहित धवन याच्या संगीत सेरेमनीचे गोवा येथे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी सहभागी झाले होते, त्यात संजूबाबाचाही समावेश होता. समारंभात आलेल्या अमिषा पटेलचा जलवा मात्र काही औरच होता. तिच्या ड्रेसकडे बघून सगळेच चकीत झाले होते. यावेळी अमिषाने खूपच एक्सपोझिंग ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे पार्टीतील अनेकांनी तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉमेण्ट्सही केल्या होत्या. मात्र ही बाब संजूबाबाला चांगलीच खटकली, त्याने अमिषाची ओढणी जोरात ओढली अन् ओढणीने तिचे ब्रेस्ट झाकण्याचा प्रयत्न केला. संजूबाबाच्या या प्रतापामुळे अमिषा मात्र चांगलीच बिथरून गेली अन् जोरजोरात ओरडायला लागली. तिचा अवतार बघून संजूबाबाही घाबरून गेला. त्याला लोकांमध्ये अपमानित झाल्यासारखे वाटले. पुढे त्याने लगेचच पार्टीतून पत्नी मान्यतासोबत काढता पाय घेतला. तसेच मुंबईच्या दिशेने रवाना झाला. काही काळानंतर अमिषाही मुंबईत आली. तिने संजूबाबावर आरोपांच्या फैरी झाडल्या. ती ही बाब मान्य करायलाच तयार नव्हती की, संजूबाबाने तिला केवळ ड्रेस कसा परिधान करावा याचा सल्ला दिला होता. ती वारंवार त्याच्यावर छेडछाडीचा आरोप लावत होती. पुढे संजूबाबाने हे प्रकरण मिटविण्यासाठी म्हटले होते की, अमिषाचा गैरसमज झाला आहे. ती माझी पत्नी मान्यताची क्लोज फ्रेंड आहे. शिवाय मी तिला लहान बहिणीसारखे समजतो. असो, पुढे या प्रकरणाचा संजूबाबावर फारसा परिणाम झाला नाही; मात्र अमिषाचे पूर्ण करिअरच उद््ध्वस्त झाले.