Join us

Whatt ! घरातून कपडे न घालताच निघाली की काय? मलायकाच्या व्हिडीओने उडवली सा-यांची धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 16:23 IST

मलायकाने वृक्षासन कशाप्रकारे करतात हे देखील तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. पण या पोस्टमुळे मलायकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले.

 छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती  फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. नेहमीप्रमाणे जिमसाठी मलायका निघाली. जिमजवळ पोहचताच ती गाडीतून उतरली आणि सारेच तिला एक टक पाहात राहिले. यावेळी मलायकाचा पेहराव पाहून काही क्षण तिच्यावरून नजर हटणार नाही. कारण तिने घातलेला सिलिकॉन ड्रेस स्कीन रंगाचा असल्यामुळे तिने अंगावर कपडेच घातले नसल्याचा भास होतो. उन्हात हा तिचा हा जिम आऊटफिट दिसतच नाही. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही तिची खिल्ली उडवत आहेत. कपडे न घालताच जिमला पोहचली की काय? अशा कमेंटस तिला युजर्स देत आहेत. पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंगमुळेच ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी देखील सोशल मीडियावर तिच्यावर टीका झाली होती. मलायकाने इन्स्टाग्रामवर नुकताच योगा करतानाचा तिचा एक फोटो पोस्ट केला होता. यासोबत तिने कॅप्शन लिहिले होते की, माझ्याप्रमाणे हे योगासन करा... आणि द दिवा योगाला टॅग करत आणि मलायकाजमुव्ह ऑफ द वीक हा हॅशटॅग टाकत तुमचा फोटो पोस्ट करा. या योगासनाला वृक्षासन असे म्हणतात. 

मलायकाने वृक्षासन कशाप्रकारे करतात हे देखील तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. पण या पोस्टमुळे मलायकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. या आंटीने छैय्या छैय्या शिवाय बॉलिवूडमध्ये काय केले आहे अशी एकाने कमेंट केली होती. अनेकांनी तर तिच्या फिगरमुळे तिला सुनावले आहे. तू आता प्रचंड बारीक दिसत आहेस असे काहींनी म्हटले तर काहींनी तू म्हातारी झाली आहेस असे देखील कमेंटद्वारे मलायकाची खिल्ली उडवली होती.

टॅग्स :मलायका अरोरा