Join us

'मस्तानी' दीपिकाच्या दागिन्यांचे मोल किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:09 IST

 एका दृश्यामध्ये रणवीर सिंगशी बोलत असताना, दीपिकाच्या अंगावर तब्बल ४८ लाख रुपयांची ज्वेलरी प्रेक्षकांना दिसेल. दिल्लीतील श्रीहरी डायजेमस् या ...

 एका दृश्यामध्ये रणवीर सिंगशी बोलत असताना, दीपिकाच्या अंगावर तब्बल ४८ लाख रुपयांची ज्वेलरी प्रेक्षकांना दिसेल. दिल्लीतील श्रीहरी डायजेमस् या २२६ वर्षांपूर्वीच्या जुन्या ज्वेलर्समधून हे दागिने घेण्यात आले होते. बाजीराव मस्तानीमधील टीम आमच्या दुकानाला भेट देण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी आमच्याकडील दागिन्यांना पसंती दर्शविली. आम्ही दीपिकासाठी दागिने डिझाईन केले, असे दुकानाचे सहसंचालक विनय गुप्ता यांनी सांगितले. या टीमने आमच्याकडील काही दागिने संजय भन्साळी यांना दाखविण्यासाठी सोबत घेतले होते. भन्साळी यांनी देखील दागिन्यांना पसंती दिल्यानंतर तातडीने डिझाईन बनविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुघल डिझाईनमधील दागिने या ठिकाणी बनविले जातात. बाजीराव मस्तानीच्या टीमने त्यांच्या आयडिया थोडक्यात आम्हाला सांगितले. मस्तानीचा इतिहास वाचून आम्ही त्यापद्धतीचे दागिने तयार केले. मस्तीनीची ज्वेलरी खूप युनिक आहे. आता या प्रकारचे दागिने बनत नाहीत. आम्ही जुम्मर पद्धतीचे पीस, हात फूल, नथ, आणि नेक पीसेस तयार केले आहेत, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे.