दीपिका पादुकोणच्या या नव्या लूकबद्दल तुम्ही काय म्हणाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 14:09 IST
बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिचा सहजसुंदर अभिनय, ओठांवरचे मधूर हास्य आणि गालांवरची मनमोहक खळी सगळ्यांनाच वेड लावते. सध्या ‘पद्मावती’च्या ...
दीपिका पादुकोणच्या या नव्या लूकबद्दल तुम्ही काय म्हणाल?
बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिचा सहजसुंदर अभिनय, ओठांवरचे मधूर हास्य आणि गालांवरची मनमोहक खळी सगळ्यांनाच वेड लावते. सध्या ‘पद्मावती’च्या शूटींगमध्ये बिझी असलेली दीपिका आठवायचे कारण म्हणजे, तिचा नवा लूक. होय, मुंबई विमानतळावर काल दीपिका एका वेगळ्याच लूकमध्ये दिसली. बॉलिवूड सेलिब्रिटी वेगवेगळे आऊटफिट ट्राय करतात, खरे तर यात काहीही नवीन नाही. एकापेक्षा एक दिग्गज ड्रेस डिझाईनर त्यांच्या दिमतीला असतात. दीपिकाच्या दिमतीलाही असेच अनेक ड्रेस डिझाईनर आहेत. अशातच काल दीपिकाच्या आऊटफिटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. डोळ्यांवर काळा चष्मा, पायांमध्ये लाईट स्लीपर आणि फिफ्टी-फिफ्टी दोन रंगाचा स्टाईलिश शर्ट अशा लूकमध्ये दीपिका विमानतळावर दिसली. तिचा हा लूक मग चर्चेचा विषय ठरला नसेल तर नवल! चर्चा कसली तर, दीपिकावरही रणवीर सिंहचा रंग तर चढू लागला नाहीय ना? अशी ही चर्चा. आता तुम्ही म्हणाल, दीपिकाचा हा ड्रेस आणि रणवीरचा संबंध काय? तर आहे. रणवीर व दीपिकाचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. रणवीर त्याच्या चित्र-विचित्र ड्रेस आणि फॅशन स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. कदाचित रणवीरच्या या स्टाईलचा परिणाम दीपिकावरही दिसू लागला आहे. विमानतळावर दीपिकाच्या या नव्या लूकची चर्चा त्याच अंगाने रंगलीय. आता यावर तुम्हाला काय वाटतेयं, ते आम्हाला जरूर कळवा. सध्या दीपिका ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे. रणवीर यात अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे.