Join us  

​सोनू सूदचा आगामी चित्रपट कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 10:32 AM

अभिनेता सोनू सूद याचा ‘कुंग फू योगा’ हा चित्रपट भारतात फारसे यश मिळवू शकला नसला तरी देखील चीनमध्ये या ...

अभिनेता सोनू सूद याचा ‘कुंग फू योगा’ हा चित्रपट भारतात फारसे यश मिळवू शकला नसला तरी देखील चीनमध्ये या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. कुंग फू योगा या चित्रपटात सोनू आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट स्टार जॅक ी चॅनसोबनत दिसला होता. सोनूने आपल्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली असून त्याचा पुढील चित्रपट हा बोयोपिक असेल असे सांगण्यात येत आहे. भारत व चीन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आल्याने हा चित्रपट आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट मानला गेला. या महत्त्वकांक्षी चित्रपटानंतर सोनू कोणता चित्रपट करेल याची उत्सुकता लागली होती. याचा खुलासा करताना सोनू म्हणाला, माझा आगामी चित्रपट बायोपिक असेल व त्यासाठी मी तयारीला लागलो आहे. सोनू आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती देताना म्हणाला, मला वाटते बायोपिकमध्ये काम करणे रोमांचक अनुभव असतो. एखाद्या व्यक्तीने जगलेले आयुष्य पडद्यावर साकारणे कठीण काम आहे, मला आठवते माझा पहिला भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘शहीद-ए-आझम’ हा बायोपिक होता. यासाठी आम्ही त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांशी भेटलो होतो. आम्हाला बायोपिकसाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. सोनू सूदने आगामी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनूचा आगामी समाजात अतीविशिष्ठ काम करणाºया व्यक्तीवर आधारित असेल असे सांगितले. मध्यंतर सोनू पहेलवान दारा सिंग यांच्या जीवानावर आधारित चित्रपटात भूमिका करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सोनूला देखील आपण एखाद्या बायोपिकमध्ये काम करावे असे आधीपासूनच वाटत होते असेही तो म्हणाला.