न्यूझीलँडमध्ये काय करतोय सिद्धार्थ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 12:22 IST
‘स्टुडंट आॅफ द ईयर’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचे एकामागोमाग एक असे ‘हसी तो फसी’,‘एक विलेन’,‘ब्रदर्स’,‘कपूर ...
न्यूझीलँडमध्ये काय करतोय सिद्धार्थ?
‘स्टुडंट आॅफ द ईयर’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचे एकामागोमाग एक असे ‘हसी तो फसी’,‘एक विलेन’,‘ब्रदर्स’,‘कपूर अॅण्ड सन्स’, ‘बार बार देखो’ अभिनय आणि कथानकाने समृद्ध असलेले चित्रपट प्रदर्शित झाले. चार वर्षांत त्याने सध्याच्या ‘ए’ ग्रेड अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये अभिनय केला. आता लवकरच तो सोनाक्षी सिन्हासोबत एका अॅक्शन थ्रिलरपटात भूमिका करताना दिसणार आहे. त्यासाठी तो जीममध्ये घाम गाळतोय अशी बातमीही काही दिवसांपूर्वी सर्वांना कळाली होती. सिद्धार्थ केवळ अभिनयावरच लक्षकेंद्रित करून उत्तम चित्रपटांची निर्मिती करतोय असे नव्हे तर त्यातून स्वत:साठी वेळ काढून तो सध्या न्यूझीलँडच्या प्रेमात पडलेला दिसतोय. त्याचं झालं असं की, तो ‘न्यूझीलँड टुरिझम’चा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. त्यामुळे तो सध्या पेनिन्सुला या नदीच्या किनाऱ्याकाठी वसलेले छोटेसे गाव ‘आकारोआ’ येथे निसर्गसौंदर्याचा आनंद उपभोगत आहे. बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी थोडा वेळ काढल्याने त्याला रोजच्या शूटिंगचा काही काळ विसर पडलाय. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ मी आणि माझा मित्र अभिषेक बधवार आम्ही डॉल्फिनप्रमाणे या नदीत छान पोहण्याचा आनंद लुटणार आहोत.’