Join us

‘काय पो चे’ टीम म्हणते,‘अजुनही बाँण्डिंग तशीच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 23:27 IST

तीन मित्रांची टीम म्हणजे अमित साध, राजकुमार राव आणि सुशांतसिंग राजपूत म्हणतात, ‘काय पो चे’ म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा.  

चेतन भगतच्या ‘थ्री मिस्टेक्स आॅफ माय लाईफ’ पुस्तकावर आधारित चित्रपट ‘काय पो चे’ २०१३ मध्ये रिलीज झाला. चित्रपटातील तीन मित्रांची टीम म्हणजे अमित साध, राजकुमार राव आणि सुशांतसिंग राजपूत म्हणतात, ‘काय पो चे’ म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनाला तीन वर्षे पूर्ण झाले म्हणून त्यांनी या तिघांना एकत्र आणले आणि ‘काय पो चे’ च्या सिक्वेलची शूटिंग करण्यापूर्वी थोडी धम्माल केली. काय पो चे वेळीची धम्माल आठवली. आणि आता ते तिघेही पुन्हा एकदा सिक्वेलसाठी रेडी झाले आहेत. अमित म्हणाला,‘ आपण जिथे ‘काय पो चे’ चे शूटिंग थांबवले होते तिथूनच आता आपल्याला पुन्हा सुरू करायचे आहे. अजुनही तो बॉण्ड तसाच आहे. चित्रपटात एक सीन आहे ज्यात आम्हाला तिघानाही पाण्यात उड्या मारायच्या असतात. मला आठवतंय की राज आणि सुशांत किती उत्साहित होते ते!’