Join us

​सलमान खान चोरून लपून करतोय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 15:23 IST

सलमान खान सध्या काय करतोय? याप्रश्नाचे उत्तर तुम्ही शूटींग असे देत असाल तर ते चूक आहे.  कारण गेल्या काही ...

सलमान खान सध्या काय करतोय? याप्रश्नाचे उत्तर तुम्ही शूटींग असे देत असाल तर ते चूक आहे.  कारण गेल्या काही दिवसांपासून शूटींगशिवाय सलमान वेगळेच काही करतो आहे. तेही अगदी चोरून लपून. होय, सलमान गेल्या २० ते २५ दिवसांपासून चोरून लपून डान्स शिकतोय. सलमान खान कोरिओग्राफर व डायरेक्टर रेमो डिसूजाच्या चित्रपटात काम करणार असल्याचे तुम्हाला ठाऊक असेलच. तर गेल्या काही दिवसांपासून याच चित्रपटासाठी सलमान खपतो आहे. खपतो म्हणजे काय, तर डान्स शिकतोय. तेही हिप-हॉप. रेमोच्या या चित्रपटात सलमान एका १३ वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण केवळ वडिल नाही तर ट्रेन्ड डान्सर. म्हणजेच, या चित्रपटात सलमान कधी नव्हे ते धम्माल डान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे   सलमान त्याची डान्सिंग स्किल वाढवताना दिसतो आहे. त्यासाठी तो खास हिप हॉप शिकतो आहे. हिप हॉपचे क्लासेस त्याने जॉईन केले आहेत.सध्या सलमान ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. या चित्रपटानंतर तो रेमोच्या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. पण त्यापूर्वी रेमोच्या स्टुडिओत त्याने डान्सची प्रॅक्टिस सुरु केली आहे. खुद्द रेमोने याची माहिती दिली आहे. सध्या सलमान माझ्या टीमसोबत ट्रेनिंग करतो आहे. चित्रपटासाठी सलमानला त्याचे वजनही कमी करावे लागणार आहे. त्यामुळे माझी टीम त्याचे डाएट आणि वर्कआऊट यावरही लक्ष ठेवून आहे. प्रत्येक स्टेपसाठी मसल्सची मुवमेंट गरजेची असते. सलमान सध्या हेच शिकतोय, असे रेमोने सांगितले. सलमानसोबत या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस झळकणार आहे. जॅक व सलमानची जोडी यापूर्वी ‘किक’मध्ये एकत्र दिसली होती.