Join us

को-स्टारसोबत सेक्स करण्यावरून ‘हे’ काय बोलून गेली सोनम कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 21:01 IST

संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावंरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री सोनम कपूर तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ...

संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावंरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री सोनम कपूर तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोनमने तिच्या करिअरमध्ये भलेही फारसे हिट चित्रपट दिले नसतील, परंतु तिच्या उथळ वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सोनमने बºयाचदा असे वक्तव्य केले की, ज्यामुळे तिची खिल्ली उडविली गेली. असेच काहीसे वक्तव्य तिने नेहा धुपियाच्या शोमध्ये केले. ज्यामुळे तिच्यावर सर्वत्र टीका केली गेली. सोनमला या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, ‘तुझ्यासोबत काम करणाºया को-स्टारसोबत तुझी केमिस्ट्री कशी असते? याचे उत्तर देताना सोनमने जे म्हटले ते सगळ्यांनाच धक्का देणारे होते. सोनमने म्हटले की, ‘मी आजपर्यंत एकाही को-स्टारसोबत सेक्स केला नाही. त्यामुळेच आॅनस्क्रीन मला माझ्या को-स्टारसोबत अधिक पसंत केले जाते. सोनमच्या या वक्तव्यानंतर बºयाच लोकांनी तिच्यावर टीका केली. या अगोदरदेखील सोनम कपूरने असेच काहीसे वक्तव्य केले होते. जेव्हा सोनमला विचारण्यात आले की, बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते? तेव्हा सोनमने म्हटले होते की, ‘मला असे वाटते की, जर तुमच्याकडे चांगला चेहरा असेल तर तुम्हाला काही लोक एक चांगली अभिनेत्री म्हणून पसंत करणार नाहीत. सोनमने ‘नीरजा’मध्ये जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र ‘नीरजा’ व्यतिरिक्त सोनमचा एकही असा चित्रपट नाही, ज्यामुळे ती स्मरणात राहू शकेल. दरम्यान, सोनमने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, ‘मी माझ्या को-स्टारसोबत केवळ चित्रपटातील सीनबाबत चर्चा करीत असते. कदाचित हेच कारण असेल की, माझे नाव अद्यापपर्यंत एकाही को-स्टारसोबत जोडले गेले नाही. सोनम लवकरच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून करिना कपूर कमबॅक करीत आहे.