Join us

​दीपिका आणि फुटबॉलपटू नेमार यांचे कनेक्शन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 21:25 IST

दीपिका पादूकोण व ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार यांचे काय कनेक्शन असू शकतं? कारण त्या दोघांच्या बाबतीत सिनेसृष्टीत बऱ्याच गपशप रंगतायत ...

दीपिका पादूकोण व ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार यांचे काय कनेक्शन असू शकतं? कारण त्या दोघांच्या बाबतीत सिनेसृष्टीत बऱ्याच गपशप रंगतायत म्हणे. मात्र तुम्ही फार विचार करु नका, कारण या दोघांमध्ये काही सुरु नाही. ज्या सिनेमातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, त्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झँडर केज’मध्ये नेमारही दिसणार आहे.दीपिकाच्या या हॉलिवूड सिनेमात नेमारची छोटा मात्र महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटात नेमारचा कॅमियो आहे. विशेष म्हणजे दीपिका नेमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.