रणबीरची पार्टी सोडून कॅटरिनासोबत काय करतोय आदित्य राय कपूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 12:10 IST
रणबीर कपूर काल १४ डिसेंबरला आजोबा राज कपूर यांच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून आपल्या नव्या घरात शिफ्ट झाला. काल रात्रीचं ...
रणबीरची पार्टी सोडून कॅटरिनासोबत काय करतोय आदित्य राय कपूर?
रणबीर कपूर काल १४ डिसेंबरला आजोबा राज कपूर यांच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून आपल्या नव्या घरात शिफ्ट झाला. काल रात्रीचं त्याने यानिमित्त झक्कास पार्टीही दिली. शाहरूख खानची पत्नी गौरी खान, करण जोहर असे रणबीरचे जवळचे आणि आवडते सेलिब्रिटी या पार्टीत दिसले. मात्र रणबीरचा अगदी जवळचा मित्र मानल्या जाणारा आदित्य राय कपूर हा मात्र या पार्टीपासून दूर राहिला. या पार्टीला जाण्याऐवजी आदित्यने रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ हिच्यासोबत वेळ घालवणे पसंत केले. स्वत:च्या बांद्रा येथील अपार्टमेंटमध्ये त्याने कॅटरिनासोबत वेळ घालवला. रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना आत्ता कुठे सावरू लागली आहे. या काळात आदित्यने कॅटरिनाला सर्वाधिक आधार दिला. याचदरम्यान आदित्य आणि कॅटरिनाच्या लिंकअपच्या बातम्याही आल्या. पण दोघांनीही या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत आम्ही केवळ चांगले मित्र असल्याचे सांगितले. अर्थात कालचे आदित्य व कॅटरिनाचे फोटो बघितल्यावर मात्र या दोघांमध्ये मैत्रीपलीकडे काहीतरी असल्याचेच तुम्हाला जाणवेल.खरे तर रणबीरच्या कालच्या हाऊस वार्मिंग पार्टीत आदित्य न जाण्यामागे दोन शक्यता असू शकतात. कदाचित कॅटरिनाशी वाढलेली त्याची जवळीक बघून रणबीरने जाणीवपूर्वक आदित्यला या पार्टीचे निमंत्रण देणे टाळले असावे किंवा कॅटरिनासोबत वेळ घालवण्यासाठी खुद्द आदित्यनेच या पार्टीकडे पाठ फिरवली असावी. पण नेमक्या रणबीरच्या पार्टीच्या दिवशी कॅट व आदि एकत्र दिसणे यातच खूप काही आले. आता स्वत: आदि व कॅट हे कधी मान्य करतात, तेच आता बघायचे. तोपर्यंत जस्ट वेट अॅण्ड वॉच...